पुणे: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आज स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात पुण्यातील विशेष न्यायालयात हजर राहिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते न्यायालयात हजर राहिले. दरम्यान न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. यादाव्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी राहुल गांधी यांच्या वतीने वकील अड. मिलिंद पवार यांनी अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला असून, पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. खासदार-आमदारांविरोधातील दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्यात राहुल गांधी यांना हजर राहण्यासाठी १० जानेवारीची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार, राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर झाले होते.
मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर
वीर सारवकर यांच्याशी संबंधित वक्तव्याबाबत पुणे न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हजर राहिले नाहीत. गांधींचे वकील मिलिंद पवार म्हणाले की, संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे काँग्रेस खासदार राहुल गांधी हे हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी सोमवारी पुण्यातील न्यायालयात हजर झाले नाहीत.
हेही वाचा: मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर, सावरकरांच्या वकिलांनी केली कारवाईची मागणी
काय आहे प्रकरण
वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात तक्रार दाखल केली होती की, राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील भाषणात सांगितले होते की, सावरकरांनी एका पुस्तकात लिहिले होते की, त्यांना आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एकदा एका मुस्लिम माणसाला मारहाण केली होती आणि यानंतर सावरकर अत्यंत आनंदी होते.
याचिकेनुसार वीर सावरकरांनी असे कुठेही लिहिलेले नाही. त्यावेळी न्यायालयाने पोलिसांना या आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. चौकशीअंती विश्रामबाग पोलिसांनी तक्रारीत प्रथमदर्शनी सत्य असल्याचे सांगितले. सह दिवाणी न्यायाधीश आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) अमोल शिंदे यांच्या खासदार-आमदार न्यायालयाने 18 नोव्हेंबर रोजी आदेश देताना राहुल गांधी यांना 2 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.
लंडनमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर खटला दाखल करण्यातला कोर्टात धाव घेतली होती. लंडन येथे भारतीय लोकांसमोर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. याबाबतचा अहवाल पोलिसांनी पुणे कोर्टात दाखल केला आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे कोर्टात राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले होते.