Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Bhiwandi Court:’माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’; राहुल गांधींच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. मध्य प्रदेशातील आमदार न्यायालय (Special MLA Court) अशा प्रकरणांची सुनावणी वेगाने करते, असेही त्यांनी नमूद केले. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 21, 2026 | 03:03 PM
Rahul Gandhi Bhiwandi Court, Defamation Case Hearing, Advocate Narayan Iyer,

Rahul Gandhi Bhiwandi Court, Defamation Case Hearing, Advocate Narayan Iyer,

Follow Us
Close
Follow Us:
  • जुन्या जामीनदाराचे निधन झाल्यामुळे हर्षवर्धन सकपाळ यांनी नवीन जामीन सादर केला.
  • माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, खटला कायदेशीररित्या लढला जाईल.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आमदारांशी संबंधित खटले फास्ट ट्रॅक’वर चालवले जातील.
Rahul Gandhi Bhiwandi Court: लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि  काँग्रेस खासदार राहुल गांधी  आज ( 21 फेब्रुवारी)  भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केलेल्या एका वक्तव्यावरून आरएसएस कार्यकर्त्यांने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज भिवंडी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राहुल गांधी यांना नवा जामीनदार  देण्याच्या सुचना केल्या.  माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजसिंह पाटील हे या प्रकरणात राहुल गांधी यांचे जामीनदार होते.पण  गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये निधन झाल्याने  राज्याचे विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना या प्रकरणात नवीन जामीनदार म्हणून सादर करण्यात आले.
Rohit Pawar Delhi PC; ‘आता मोदी शहाचं अजित दादांना न्याय देऊ शकतात..’; रोहित पवारांनी थेट पंतप्रधान मोदींकडे

‘माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”; राहुल गांधींच्या वकिलांनी सुनावणीनंतर स्पष्ट केली भूमिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर राहुल गांधींचे वकील नारायण अय्यर यांनी न्यायालयाबाहेरील घडामोडी आणि कायदेशीर प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. न्यायालयातील सुनावणीबाबत माहिती देताना अय्यर म्हणाले की, ‘राहुल गांधींना यापूर्वी जामीन देणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेनुसार नवीन जामीनदार देणे आवश्यक होते. आता हर्षवर्धन सकपाळ यांनी राहुल गांधींसाठी जामीन सादर केला असून, न्यायालयाने नवीन सुरक्षा (Surety) मंजूर केली आहे.
दरम्यान, “राहुल गांधी ( Rahul Gandhi) या प्रकरणात माफी मागून खटला निकाली काढणार का?” या प्रश्नावर नारायण अय्यर यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. ते म्हणाले, “माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आजची प्रक्रिया ही केवळ जामीन आणि नवीन सुरक्षा पुरवण्यापुरती मर्यादित होती. आम्ही न्यायालयाच्या निर्देशानुसार कायदेशीर लढाई लढत आहोत.”
राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा खटला जलदगतीने चालवला जाणार आहे. मध्य प्रदेशातील आमदार न्यायालय (Special MLA Court) अशा प्रकरणांची सुनावणी वेगाने करते, असेही त्यांनी नमूद केले.  या प्रकरणाची पुढील सुनावणी आता मार्च महिन्यात होणार आहे.  दरम्यान,  काँग्रेस  नेते राहुल गांधी यांच्या भिवंडी न्यायालयीन हजेरीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीपासून भिवंडीपर्यंत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निदर्शनांची मालिका पाहायला मिळाली.
शुक्रवारी काँग्रेसच्या (Congress) युवा संघटनेने (IYC) एअर इंडिया समिटमध्ये केलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाला. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस मुख्यालयाकडे कूच करत घेराव घालण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी भिवंडी न्यायालयाकडे जात असताना, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरुद्ध केलेल्या घोषणाबाजीचा हा प्रतिशोध असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.
कान्हेरी लेण्यांना भेट देणे महाग! Sanjay Gandhi National Park प्रशासनाच्या निर्णयावर टीका

न्यायालय परिसरात ‘हाय अलर्ट’

राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. भिवंडी न्यायालय परिसरात बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि श्वान पथकाद्वारे (Dog Squad) सखोल तपासणी करण्यात आली.
न्यायालय आणि आजूबाजूच्या परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सुरक्षा यंत्रणा ड्रोन आणि गुप्तचर विभागाच्या माध्यमातून परिसरावर लक्ष ठेवून होत्या. व्हीव्हीआयपी (VVIP) सुरक्षेच्या नियमांनुसार केवळ अधिकृत व्यक्तींनाच न्यायालय कक्षात प्रवेश दिला जात होता.

Web Title: There is no question of apologizing rahul gandhis lawyers clarify their position after the hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi
  • RSS

संबंधित बातम्या

Mohsina Kidwai Passes Away : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खास स्नेह
1

Mohsina Kidwai Passes Away : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मोहसिना किदवाई यांचे निधन; इंदिरा गांधींशी होता खास स्नेह

मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
2

मतदान लोकशाहीतील उत्सव, जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Nagpur News: नागपूर RSS मुख्यालयाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सापडले; शहरात हाय अलर्ट
3

Nagpur News: नागपूर RSS मुख्यालयाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर सापडले; शहरात हाय अलर्ट

Baramati Byelection : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँग्रेसकडून आकाश मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल
4

Baramati Byelection : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँग्रेसकडून आकाश मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.