
Maha Metro Pune
हीच कारणे की, गेल्या काही महिन्यांत डिजिटल तिकिटांचा वापर तब्बल ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत झेपावला आहे. या वाढत्या टक्केवारीतून पुणेकरांचा ‘डिजिटल प्रवास संस्कार’ अधिक घट्ट होत असल्याचे अधोरेखित होते. ‘डिजिटल इंडिया’च्या संकल्पनेला वास्तवात आणणाऱ्या नागरीकरणाच्या प्रक्रियेत पुणे मेट्रोची ही झेप महत्त्वाची ठरत असून, शहराचा प्रवास आता खऱ्या अर्थाने डिजिटल महामार्गावर सुरू झाल्याचे चित्र स्पष्टपणे उमटू लागले आहे.
पुणे मेट्रोने (महा मेट्रो) सुरुवातीपासूनच तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला चालना देण्यास पूरक कार्यप्रणालीचा अवलंब केला. यामुळे, प्रवाशांना तिकीट रांगेत न थांबता थेट मोबाईलवरून किंवा स्थानकावरील मशिनद्वारे तिकीट काढण्याची सुविधा मिळाली. दररोजच्या धावपळीच्या जीवनात वेळेची बचत होत असल्यामुळे, प्रवाशांनी मोबाईल ॲप, व्हॉट्सॲप, किऑस्क अशा डिजिटल माध्यमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
नोकऱ्या करणारे आणि तरुण वर्ग यांच्याकडून डिजिटल तिकिटांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. तिकीट खिडक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी आणि व्यवहारात पारदर्शकता राखण्यासाठी ही पद्धत अत्यंत सोयीची ठरत आहे.
शॉपिंग मॉल्स, फूड कोर्ट्स, विमानतळ किंवा रेल्वे स्थानके असोत; सर्वत्र नागरिक ऑनलाइन पेमेंट आणि व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. याच बदलाचे चित्र पुणे मेट्रोमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पुणे मेट्रो प्रशासनाने डिजिटल तिकिटांसाठी खालील अनेक सोपे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना ‘कॅशलेस’ व्यवहार करणे अत्यंत सोपे झाले आहे:
व्हॉट्सॲप तिकीट सुविधा: आता थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असून, यामुळे तिकीट काढणे अत्यंत सोपे झाले आहे.
महामेट्रो कार्ड (स्मार्ट कार्ड): मेट्रो प्रवासासाठी विशेष कार्डचा वापर. स्थानकावरील तिकीट व्हेंडिंग मशीन्स
किऑस्क: डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) द्वारे पेमेंट करून त्वरित तिकीट काढता येते.
QR कोड स्कॅनिंग: मोबाईल ॲपवरील किंवा व्हॉट्सॲपवरील QR कोड स्कॅन करून थेट प्रवेश आणि निर्गमनाची सोय.
डिजिटल तिकिटांच्या वापरामुळे केवळ प्रवाशांचा वेळ वाचत नाही, तर मोठ्या प्रमाणात कागदाची बचत होत आहे. या ‘पेपरलेस’ उपक्रमाने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यामुळे, पुणे मेट्रोने शहरवासीयांना आधुनिक, वेगवान आणि पर्यावरणास पूरक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिल्याचे सिद्ध झाले आहे. पुणे मेट्रोने डिजिटल पेमेंट प्रणालीला चालना देण्यात मोठे यश मिळवले आहे.
(पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गावरील सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यानची आकडेवारी.)
पेपर टिकिट : ४२ लाख ७५ हजार ६७१
मोबाईल ॲप: ५२ लाख ९१ हजार १६८
किऑस्क: २३ लाख ७४ हजार ८८८
तिकीट व्हेडिंग मशिन: ६ लाख ९२ हजार ३४३
एकूण तिकिटे: १ कोटी २६ लाख ३४ हजार ७०
कागदी तिकिटे: ७३ लाख ४२ हजार ९०२
डिजिटल तिकिटे: ५२ लाख ९१ हजार १६८