Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC Metro News: ९१० कोटींचा प्रकल्प, पण…;मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प या ४.५१९ किलोमीटरच्या मार्गासाठी ९१० कोटी १८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 04, 2026 | 06:28 PM
PCMC Metro News: ९१० कोटींचा प्रकल्प, पण…;मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
Follow Us
Close
Follow Us:
  • खोदकामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे श्वसनाचे विकार आणि डोळ्यांच्या जळजळीत वाढ
  • बॅरिकेड्समुळे रस्ते अरुंद झाले असून रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली
  • मेट्रोच्या कामामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट झाला असून आकुर्डी-बजाज ऑटो पट्ट्यात प्रचंड कोंडी
विजया गिरमे – Pimpri-Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहराच्या दळणवळणात मैलाचा दगड ठरणाऱ्या पिंपरी ते निगडी या मेट्रो विस्तारीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, या कामाच्या संथ गतीमुळे आणि मुंबई-पुणे महामार्गावर निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. एका बाजूला २०२७ अखेरपर्यंत स्वारगेटपर्यंत थेट प्रवासाचे स्वप्न प्रशासन दाखवत असताना, दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांमुळे ‘विकासाची वाट’ खडतर झाली आहे. Pune Metro

PM-USHA Scheme: पीएम-उषा योजनेचा ‘बूस्टर’! अनुसूचित जाती उपघटकासाठी १७ लाखांचा निधी वाटप

कामाचा लेखाजोखा आणि सद्यस्थिती

चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प या ४.५१९ किलोमीटरच्या मार्गासाठी ९१० कोटी १८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १५ मार्च २०२४ रोजी रेल विकास निगम लिमिटेडला (RVNL) या कामाचे आदेश देण्यात आले. सद्यस्थिती पाहता:

आकुर्डीतील खंडोबा माळ ते बजाज ऑटो दरम्यान सेगमेंट जोडणी पूर्ण झाली आहे.

निगडीतील अण्णा भाऊ साठे बस टर्मिनस येथे स्टेशनचे काम सुरू आहे.

भक्ती-शक्ती, टिळक चौक आणि चिंचवड स्टेशन या चारही प्रस्तावित स्थानकांच्या जिन्यांचे काम सुरू झाले असले तरी त्याची गती कमी आहे. (Pimpri-Chinchwad News)

 

वाहतूक कोंडी आणि नियोजनाचा अभाव

मेट्रोच्या खांबांसाठी महामार्गाच्या मध्यभागी मोठे खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून, निगडी ते पिंपरी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

अपघातप्रवण क्षेत्र: बॅरिकेड्स आणि राडारोड्यामुळे मार्ग अरुंद झाल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वेळ वाचवण्यासाठी अनेक जण ‘रॉन्ग साईड’ने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

धुळीचे साम्राज्य: खोदकामामुळे परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. याचा थेट परिणाम वाहनचालकांच्या दृश्यमानतेवर आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. श्वसनाचे विकार वाढत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत.

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका

प्रशासनाचा दावा विरुद्ध वस्तुस्थिती

महामेट्रो प्रशासनाने हे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काम सुरू होऊन दोन वर्षे उलटली तरी अद्याप एकाही स्टेशनचे काम पूर्ण झालेले नाही. जर कामाचा वेग वाढला नाही, तर ही मुदत उलटून जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर काम वेळेत पूर्ण झाले, तर २०२८ पासून निगडी, प्राधिकरण आणि आकुर्डी परिसरातील प्रवाशांना थेट स्वारगेटपर्यंत विनाअडथळा प्रवास करता येईल.

दृष्टीक्षेपात प्रकल्प

पिंपरी-चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी भक्ती-शक्ती (निगडी) ते मदर टेरेसा पूल या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे निगडी आणि पिंपरी परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

 

नागरिकांच्या प्रमुख मागण्या:

मेट्रोचे काम युद्धपातळीवर करून रस्ते मोकळे करावेत.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वाच्या चौकांत अतिरिक्त पोलीस तैनात करावेत.

धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमितपणे पाणी फवारणी करावी.

विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.

मेट्रोचे काम शहराच्या भविष्यासाठी आवश्यक आहे, यात शंका नाही. मात्र, काम सुरू असताना पर्यायी वाहतूक व्यवस्था आणि धूळ नियंत्रणासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. सध्या प्रवाशांचा दोन किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धा तास जात आहे. — श्वेता शिंदे, चिंचवड

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या खोदकामामुळे परिसरात धुळीचे प्रचंड लोट उसळतात. याचा त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. रस्ते अरुंद झाल्याने अपघातांची भीतीही वाढली आहे. महामेट्रोने धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दररोज पाणी फवारणी करायला हवी. — राहुल शेळके, चिंचवड

मेट्रोचे काम आवश्यक आहेच, पण त्यासाठी मुंबई-पुणे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आता असह्य होत आहे. आकुर्डी आणि चिंचवड स्टेशन परिसरात सकाळी आणि संध्याकाळी तासन्तास अडकून राहावे लागते. — सुनीता देशपांडे, नोकरदार महिला.

 

Web Title: A project worth rs 910 crore but citizens are suffering due to traffic jams on the mumbai pune highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Mumbai-Pune Highway
  • Pune Metro
  • traffic jam

संबंधित बातम्या

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?
1

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
2

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.