सध्याच्या फेज १ मार्गांवर ऑटोमेशन आणले जाईल, परंतु चालक हे निरीक्षणासाठी उपस्थित राहतील. एकदा प्रणाली अपग्रेड झाल्यावर, फेज १ चे मार्गदेखील नंतर ड्रायव्हरलेस बनवले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये भविष्यातील मेट्रो विस्तारीकरणाच्या आराखड्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुगेवाडी येथील पुणे महामेट्रो कार्यालयात पदाधिकारी आणि संचालकांसोबत बैठक घेतली.
कोथरुडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे.
आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब देखील ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत…
पुणे शहरातील गणेशोत्सव हे जगप्रसिद्ध असून जगभरातून भाविक हे दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोच्या वतीने सर्व मार्गावर मेट्रो सुरू झाल्याने गणेशोत्सवात येणारे भाविक मोठ्या संख्येने मेट्रो सेवेचा लाभ घेत…
शुकवारी मेट्रोची माण डेपो ते पीएमआर ४ स्थानकापर्यंत पहिलीच चाचणी धाव घेण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे पुणे मेट्रो लाईन ३ कार्यान्वित होण्याच्या अंतिम टप्यापर्यंत पोहोचली आहे.
महामेट्रोच्या वतीने वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू आहे. दररोज सरासरी ७० हजारांहून अधिक नागरिक मेट्रोने प्रवास करत आहेत.
पुणेकरांसाठी हा निर्णय म्हणजे वाहतूक कोंडीवरचा उपाय आणि वेगवान प्रवासासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पुर्वेकडील आयटी हब मेट्रोने जोडले जाणार आहे.
विविध परवानगी आणि वाहतूक नियोजन दृष्टीने काही स्थानकांची कामे वेळेपेक्षा अधिक लांबली असल्याने मुदतवाढ देण्याची नामुष्की प्रकल्पावर आली. प्रामुख्याने इंटर कनेक्ट काम असल्याने विद्यापीठ चौकामध्ये कामाची गती कमी आहे.
मेट्रो स्थानकावर येण्यापूर्वी कोणाला फोन, मेसेज केले होते, तसेच या घटनेमागचा सूत्रधार कोण, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.
पुणे मेट्रोचे ६ मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले होते. यानंतर दोन प्रारंभिक मार्गांसह, पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वानझ ते गरवारे कॉलेज या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू…
पुण्यात ६ मार्च २०२२ रोजी पहिल्यांदा मेट्रो धावली होती. टप्प्याटप्प्याने सेवा वाढविली गेली. मेट्रो मार्गांच्या नेटवर्कचा विस्तार झाल्याने पुणेकरांसाठी एक वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज विस्तारीत मार्गाचे कामाचे भूमिपूजन झाले आहे.
महामेट्राेने शहरातील मध्यभागातून भुयारी मार्ग आणि स्टेशन उभारले आहे. हे उभारताना परीसरातील काेणत्याही इमारतीला हानी पाेहचणार नाही याची काळजी घेतली आहे.
पुण्यामध्ये मेट्रोचे काम सुरु झाल्यामुळे महत्त्वाच्या बस स्थानकांचे काही काळासाठी स्थलांतर करण्यात आले होते. मात्र दोन्ही विभागांमध्ये मतभेद झाल्यामुळे काम रखडले होते. हे काम पूर्ववत करण्यात आले आहे.
Pune News: विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे महानगर प्रभाव क्षेत्रातील सर्वंकष वाहतूक आराखडा अद्ययावत करणे व पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात आयोजित आढावा बैठक पार पडली.