Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदासाठीची परीक्षा पुढे ढकलली; भाजप युवा मोर्चाच्या मागणीला यश

पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, 1 डिसेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 03:19 PM
पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदासाठीची परीक्षा पुढे ढकलली; भाजप युवा मोर्चाच्या मागणीला यश

पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदासाठीची परीक्षा पुढे ढकलली; भाजप युवा मोर्चाच्या मागणीला यश

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणे महानगरपालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
  • कनिष्ठ अभियंता पदासाठीची परीक्षा पुढे ढकलली
  • भाजप युवा मोर्चाच्या मागणीला यश
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, 1 डिसेंबर 2025 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. उमेदवारांची गैरसोय, आगामी मतदान प्रक्रिया तसेच शासकीय कर्तव्यांमध्ये अडकलेले परीक्षार्थी यांचा सर्वांगीण विचार करून पुणे महापालिका प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला आहे.

भाजप पुणे शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना दिलेल्या सविस्तर निवेदनात परीक्षेच्या तारखेमुळे उमेदवारांना भेडसावणाऱ्या वस्तुनिष्ठ अडचणी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या होत्या. पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा 1 डिसेंबर रोजी होणार होती, तर राज्यातील मतदान 2 डिसेंबरला निश्चित आहे. अनेक परीक्षार्थींना मतदानासाठी 250–300 कि.मी किंवा त्याहून अधिक अंतर प्रवास करावा लागणार होता. यामुळे परीक्षेनंतर त्वरित मूळ गावी पोहोचणे, दुसऱ्या दिवशी मतदानासाठी वेळेत उपस्थित राहणे, हे प्रत्यक्षात अशक्य बनत होते. काही उमेदवारांना निवडणूक संदर्भातील काम असल्यामुळे परीक्षा व शासकीय कर्तव्ये एकाच दिवशी सांभाळणे अत्यंत कठीण आहे, या सर्व भाजप युवा मोर्चाच्या मागणीचा विचार करुन पुणे महापालिका प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत आदेश काढत परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली असून, नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

दुष्यंत मोहोळ यांची प्रतिक्रिया

“उमेदवारांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा आणि परीक्षा पारदर्शक राहावी, ही आमची स्पष्ट भूमिका होती. प्रशासनाने या मुद्द्यांची योग्य दखल घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभार मानतो. आगामी परीक्षेसाठी TCS, iON सारख्या उच्च-स्तरीय केंद्रांनाच प्राधान्य द्यावे, ही युवा मोर्चाची ठाम भूमिका राहील,” असे भाजप पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.

Web Title: Pune municipal corporation has decided to postpone the examination for the post of junior engineer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Election News
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण
1

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन
2

Purandar मध्ये GBS चा रूग्ण? ‘या’ हॉस्पिटलमध्ये रूग्णावर उपचार सुरू; आरोग्य विभागाने केले ‘हे’ आवाहन

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?
3

पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच ‘या’ मेट्रो मार्गांचे काम सुरू होणार, काय म्हणाले Murlidhar Mohol?

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
4

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.