Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chakan MIDC: हजारो कामगारांची समस्या दूर; चाकण एमआयडीसी फेज-२ साठी पीएमपीएमएलची बससेवा सुरू

PMPML Chakan MIDC : बससेवा सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी या मार्गावर अद्याप अधिकृत बसथांबे नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बस नेमकी कुठे थांबणार याची स्पष्ट व्यवस्था नसल्याने कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 15, 2026 | 04:04 PM
PMPML Launches New Bus Service For Chakan MIDC Phase 2 Workers

PMPML Launches New Bus Service For Chakan MIDC Phase 2 Workers

Follow Us
Follow Us:

PMPML Chakan MIDC Phase 2 Bus:  चाकण एमआयडीसी औद्योगिक वसाहतीच्या फेज-२ परिसरातील हजारो कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधेमुळे दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक भार वाढत होता, तर अनेकांना वेळेवर कामावर व शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचणेही कठीण होत होते.

या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)ने चाकण एमआयडीसी फेज-२ साठी नवीन सार्वजनिक बससेवा सुरू करून मोठा दिलासा दिला आहे.औद्योगिक परिसरातील कंपन्या, कर्मचारी, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून सार्वजनिक वाहतुकीची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीची दखल घेत पीएमपीएमएलने बसची मर्यादित उपलब्धता असतानाही चाकण परिसरासाठी विशेषतः सहा बस उपलब्ध करून दिल्या आहेत.ही बससेवा चाकण – आळंदी फाटा – एच.पी. चौक – एअर लिक्विड – जी.ई. कंपनी – शिंदे गाव – वासुली – वराळे – आंबेठाण या मार्गावर धावणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी दर अर्ध्या तासाने बस उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगार, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांना सुरक्षित, नियमित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे.

Supreme Court Row: न्यायालयातील गोंधळाप्रकरणी प्रबल प्रतापसह दोघे अटकेत; गुन्हा दाखल

या बससेवेमुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असून वाहतूक कोंडी आणि इंधन खर्चातही काही प्रमाणात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती वाढून औद्योगिक कार्यक्षमतेलाही चालना मिळणार आहे.बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी पीएमपीएमएलचे विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव, पिंपरी-चिंचवड डेपो व्यवस्थापक शैलेंद्र नाईक, शिंदे गावच्या सरपंच संगीता केंदळे, संचालक विनोद जैन, ओईएन कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक हरी राव, ट्रेंड टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापक बसवराज पाटील, निगडीचे एडीएम मच्छिंद्र तिटकरे, स्वारगेट नियोजन विभागाचे नवनाथ बधे, तसेच देवकर, पानमंद आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा

यावेळी विभागीय व्यवस्थापक राजेश जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना, ही बससेवा दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी औद्योगिक कंपन्या, कर्मचारी आणि नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच संगीता केंदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्थानिकांच्या मते, बसथांबे निश्चित झाल्यास प्रवाशांची सुरक्षितता वाढेल, बससेवा अधिक शिस्तबद्ध होईल आणि या नवीन सेवेचा लाभ अधिकाधिक नागरिकांना प्रभावीपणे मिळू शकेल.

POCSO Act Misuse:पालक ‘प्रतिष्ठेसाठी’ फौजदारी गुन्हे दाखल करतात; पॉक्सो कायद्याच्या गैरवापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची चिंता

बसथांबे उभारण्याची नागरिकांची मागणी

बससेवा सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी या मार्गावर अद्याप अधिकृत बसथांबे नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. बस नेमकी कुठे थांबणार याची स्पष्ट व्यवस्था नसल्याने कामगार, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बससेवा सुरू केली त्याचप्रमाणे नियोजित ठिकाणी तातडीने बसथांबे उभारून त्याठिकाणी फलक, वेळापत्रक आणि प्रवासी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

Web Title: Pune news chakan midc phase 2 pmpml new bus service launched workers students relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Chakan News
  • MIDC
  • PMPML
  • Public Transport

संबंधित बातम्या

Mumbai Metro : मुंबईकरांचा आनंदाची बातमी! घाटकोपर ते वर्सोवा प्रवास होणार सुखकर, मेट्रोचा नेमका प्लॅन कोणता?
1

Mumbai Metro : मुंबईकरांचा आनंदाची बातमी! घाटकोपर ते वर्सोवा प्रवास होणार सुखकर, मेट्रोचा नेमका प्लॅन कोणता?

चाकण MIDC परिसरात मोठी वाहतूक कोंडी; केवळ 10 किलोमीटर अंतरासाठी लागले तब्बल तीन तास
2

चाकण MIDC परिसरात मोठी वाहतूक कोंडी; केवळ 10 किलोमीटर अंतरासाठी लागले तब्बल तीन तास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.