खेड तालुक्यासह चाकण शहर व परिसरात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि व्यावसायिक वर्गाला बसला आहे.
हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाकी बुद्रुक, शेलपिंपळगाव व बिरदवडी येथील पाणवठ्यांमध्ये गणेश विसर्जन करताना चार तरुण पाण्यात बुडाले. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून, एकाचा शोध अद्याप सुरू…
चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या बाहेर रोज सकाळी मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री सुरू ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.
अजित पवार यांनी आज वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौकात पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांना कडक शब्दांत फटकारले आणि वाहतूक तात्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिले.
रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
चाकण नगरपरिषद २०१६ मध्ये स्थापन झाली, परंतु गेल्या ९ वर्षांत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या मूलभूत सुविधांकडे आणि परिसराच्या विकासाकडे लक्ष दिले नाही.
दररोज हजारो प्रवाशांना आपल्या खांद्यावर घेऊन इच्छितस्थळी पोहोचून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक, शिवाय आनंददायक अनुभव देणारी रेल्वे आज आपले स्थान टिकवून आहे.