Pune Police registers case against Pooja Khedkar's mother Manorama Khedkar for obstructing action
Pooja Khedkar Mother : पुणे : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर ही पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. बडतर्फ पूजा खेडकर हिच्या उमेदवारीवरुन वाद निर्माण झालेला असताना पूजाची आई मनोरमा खेडकरने नवा पराक्रम केला आहे. खेडकर कुटुंबाने अपघात झालेल्या ड्रायव्हरचे थेट अपहरण केले असून त्याला डांबून ठेवले आहे. या अपहरणावरुन नोटीस बजवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर देखील कुत्रे सोडण्यात आली. यामुळे खेडकर कुटुंब वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले असून वाद निर्माण झाला आहे.
घरी नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत भयानक प्रकार घडला. चक्क पोलिसांच्या अंगावर चक्क कुत्रे सोडण्यात आली. पुणे शहर पोलिसांनी वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर भा.दं.सं. कलम 221 शासकीय कामात अडथळा आणणे, कलम 238 गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना कायदेशीर शिक्षेतून वाचवणे आणि कलम 263 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खेडकर कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
खेडकर कुटुंबाचा नवा प्रताप हा नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला मनोरमा खेडकर यांच्या घरी आणले होते. तपासादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणाचा मागोवा घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिसांचा आरोप आहे की, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विरोध केला आणि आरोपीला पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
वादग्रस्त आणि निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचा आणखी एक प्रताप पुढे आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली रोडवरील ऐरोली हद्दीतील सिग्नलवर प्रल्हाद कुमार वय 22 राहणार तुर्भे… pic.twitter.com/61ZzrvHAl0
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) September 14, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांवर मनोरमा खेडकर यांनी कुत्रेही सोडले
ट्रक क्लिनर प्रल्हाद कुमार याच्या अपहरणामध्ये पूजा खेडकरचे वडील आणि मनोरमा खेडकर यांचे पती दिलीप खेडकर यांचाही समावेश असल्याचे समोर आलं आहे. जेव्हा पोलीस पथकान खेडकरांच्या घरात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनोरमा खेडकर यांनी त्यांना अडवलं आणि दिलीप खेडकर यांना पळून जाण्यास मदत केली. त्याचबरोबर पोलिसांवर मनोरमा खेडकर यांनी कुत्रेही सोडले. यावरुनय सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चतुश्रृंनी पोलिसांनी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल केला आहे.
Pune City Police have registered a case against Manorama Khedekar, mother of ex-IAS trainee officer Puja Khedkar, at Chaturshrangi Police Station. She has been booked under Sections 221, 238, and 263 of BNS. The case stems from a road rage incident in Navi Mumbai, where two…
— ANI (@ANI) September 15, 2025