Pune Police Transfer News:
Pune Police News: पुणे शहर पोलिस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून, गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा आणि वाहतूक विभागात अनेक अधिकारी बदलले गेले आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बदल्यांमध्ये ६ गुन्हे शाखेचे निरीक्षक समाविष्ट आहेत. दरम्यान, वादग्रस्त ठरलेल्या कोंढवा आणि येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बदली अनुक्रमे कंट्रोल आणि वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.
AFG vs BAN : ‘लज्जास्पद’ पराभवानंतर बांगलादेशच्या चाहत्यांचा टीमवर राडा, वाहनांवर केला हल्ला!
नवीन बदलीनुसार अधिकाऱ्यांचे सध्याचे ठिकाण आणि त्यांची नवीन नेमणूक पुढीलप्रमाणे :
कांचन जाधव – विश्रांतवाडी पोलिस ठाणे → गुन्हे शाखा
रवींद्र शेळके – येरवडा पोलिस ठाणे → वाहतूक शाखा
माया देवरे – मुंढवा पोलिस ठाणे → गुन्हे शाखा
सुनील पंधरकर – नियंत्रण कक्ष → आर्थिक गुन्हे शाखा
विजय टिकोळे – विशेष शाखा → वाहतूक शाखा
अजय संकेश्वरी – नियंत्रण कक्ष → आर्थिक गुन्हे शाखा
संतोष सोनवणे – नियंत्रण कक्ष → गुन्हे शाखा
संदीपान पवार – विशेष शाखा → गुन्हे शाखा
अरुण हजारे – नियंत्रण कक्ष → आर्थिक गुन्हे शाखा
गुरुदत्त मोरे – नांदेड सिटी पोलिस ठाणे → विशेष शाखा
दत्ताराम बागवे – विश्रांतवाडी पोलिस ठाणे → गुन्हे शाखा
अंजुम बागवान – गुन्हे शाखा → येरवडा पोलिस ठाणे
मंगेश हांडे – नवीन नेमणूक : विश्रांतवाडी पोलिस ठाणे
स्मिता वासनिक – गुन्हे शाखा → मुंढवा पोलिस ठाणे
भाऊसाहेब पाटील – गुन्हे शाखा → वानवडी पोलिस ठाणे
कुमार घाडगे – गुन्हे शाखा → कोंढवा पोलिस ठाणे
प्रदीप कसबे – आर्थिक गुन्हे शाखा → विश्रामबाग पोलिस ठाणे
पुणेकरांनो सावधान! शहरात हवेचा दर्जा खालावला; हवा गुणवत्ता निर्देशांकाने गाठला ‘मध्यम’ प्रवर्ग
या बदल्यांमुळे पोलिस दलातील अंतर्गत रचनेत नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणि तपास यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या फेरबदलांना महत्त्व दिले जात आहे.