फोटो सौजन्य - Bangladesh Cricket
काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशचा पराभव केला. त्यांनी मालिका ३-० अशी जिंकली. टी20 मालिकेमध्ये अफगाणिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी एकदिवसीय मालिकेमध्ये तीनही सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिका एकतर्फी जिंकली आहे. यामध्ये अफगाणिस्तानच्या गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजी देखील दमदार राहिली. बांग्लादेशच्या फलंदाजांची कामगिरी एकदिवसीय मालिकेमध्ये फारच निराशाजनक राहिली आहे. मेहदी हसनच्या नेतृत्वाखाली संघाला दारुण पराभव पत्करावा लागला.
यामुळे चाहते संतप्त झाले आहेत आणि एका अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा खेळाडू बांगलादेशला परतले तेव्हा विमानतळावर त्यांना मारहाण करण्यात आली. एवढेच नाही. बांगलादेशचा खेळाडू मोहम्मद नैम शेखने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश लिहिला आणि त्याच्या वाहनांवर हल्ला झाल्याचे उघड केले.
बांगलादेशच्या दारुण पराभवानंतर मोहम्मद नैम शेख यांनी सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की विजय आणि पराभव स्वाभाविक आहे, परंतु त्यांच्या वाहनांवर हल्ला करणे योग्य नाही. ते म्हणाले, “आपण फक्त खेळण्यासाठी मैदानात उतरत नाही, तर आपल्या देशाचे नाव छातीवर घेऊन येतो. हा ध्वज आपल्या हृदयात आहे. कधीकधी आपण यशस्वी होतो, कधीकधी नाही. विजय आणि पराभव होतो. आम्हाला माहित आहे की जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ते दुखावते कारण तुम्हाला या देशावर प्रेम आहे.”
नईम शेख पुढे म्हणाले, “आज आपल्याबद्दल दाखवलेला द्वेष, आपल्या वाहनांवर झालेला हल्ला, खूप वेदनादायक आहे. आपण मानव आहोत आणि आपण चुका करतो. आपण आपल्या देशासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आपल्याला प्रेमाची गरज आहे, द्वेषाची नाही. आपल्याला टीकेची गरज आहे, रागाची नाही. जिंका किंवा हरवा, हा ध्वज आपला अभिमान आहे. आपण लढू आणि पुन्हा उठू – आपल्या देशासाठी आणि आपल्या ध्वजासाठी.”
बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळले. त्यांचे निकाल खाली दिले आहेत:
८ ऑक्टोबर २०२५ : पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला.
११ ऑक्टोबर २०२५ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा ८१ धावांनी पराभव केला.
१४ ऑक्टोबर २०२५ : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशचा २०० धावांनी पराभव केला.