Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election 2026: तांत्रिक बिघाड रोखण्यासाठी निवडणूक आयोगाची खबरदारी; भोसरीत जुनी यंत्रे सीलबंद

महापालिका निवडणुकीत बंद पडलेल्या १,१९२ मतदानयंत्रे आणि ८१२ कंट्रोल युनिट सध्या जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 26, 2026 | 04:27 PM
Pune ZP Election 2026, EVM Availability, Control Units,

Pune ZP Election 2026, EVM Availability, Control Units,

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतदानयंत्रे आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे
  • पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे
  • महापालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याच्या शेकडो घटना
Pune Ziila Parishad Election 2026: मागील नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांदरम्यान अनेक ठिकाणी मतदानयंत्रे आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. या अनुभवातून धडा घेत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानयंत्रांची उपलब्धता थेट चारपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे असून, यासाठी तब्बल १४ हजारांहून अधिक मतदानयंत्रे आणि ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट बंद पडल्याच्या शेकडो घटना घडल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते तासभर मतदान थांबले होते. तातडीने पर्यायी यंत्रे उपलब्ध न झाल्याने मतदारांच्या लांब रांगा लागल्या आणि सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू राहिले होते. या पार्श्वभूमीवर, यंदा कोणत्याही परिस्थितीत मतदान प्रक्रिया खोळंबू नये, यासाठी अतिरिक्त यंत्रांचा साठा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– जिल्हा प्रशासनाच्या भोसरी गोदामात नादुरुस्त यंत्रे सीलबंद

महापालिका निवडणुकीत बंद पडलेल्या १,१९२ मतदानयंत्रे आणि ८१२ कंट्रोल युनिट सध्या जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत.

– इंदापूर तालुक्यात सर्वाधिक, वेल्हा तालुक्यात सर्वांत कमी मतदान केंद्रे

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ४०० मतदान केंद्रे असून, तेथे १,६६४ मतदानयंत्रे आणि ६६० कंट्रोल युनिट देण्यात आली आहेत. तर वेल्हा तालुक्यात सर्वात कमी १०५ मतदान केंद्रे असून, तेथे ४३७ मतदानयंत्रे आणि १७३ कंट्रोल युनिट उपलब्ध असणार आहेत. उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यानी सांगितले की, “महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन, यंत्रे बंद पडल्यास तात्काळ बदल करता यावा, यासाठी मतदानयंत्रांची उपलब्धता चारपटीने वाढविण्यात आली आहे.

– अर्ज माघारीसाठी राहिले केवळ दोनच दिवस शिल्लक

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेसाठी १० आणि पंचायत समितीसाठी १२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. २७ जानेवारी हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र २५ आणि २६ जानेवारी या सार्वजनिक सुट्टया असल्याने उमेदवारांना प्रत्यक्षात केवळ २४ आणि २७ जानेवारी असे दोनच दिवस उपलब्ध असणार आहेत.

दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ७ गणांसाठी दाखल ९५ अर्जापैकी ४ अर्ज माघारी घेण्यात आले आहेत. पंचायत समितीसाठी दौंडमधून ६, इंदापूरमधून ३, तर शिरूर, खेड आणि वेल्हा तालुक्यांतून प्रत्येकी एका उमेदवाराने माघार घेतली आहे. अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी ६११ आणि पंचायत समितीसाठी १,११० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. अंतिम चित्र २७जानेवारीनंतर स्पष्ट होणार असून, त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

 

 

Web Title: Pune zp election 2026 over 14000 evms deployed for pune zp polls to tackle technical glitches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Maharashtra Zilla Parishads Election
  • Panchayat Samiti Election
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

Kolhapur ZP Election 2026: गडहिंग्लजमध्ये महायुतीत सावळा गोंधळ राष्ट्रवादी-भाजपा आमने-सामने; महाविकास आघाडी बॅकफूटवर
1

Kolhapur ZP Election 2026: गडहिंग्लजमध्ये महायुतीत सावळा गोंधळ राष्ट्रवादी-भाजपा आमने-सामने; महाविकास आघाडी बॅकफूटवर

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?
2

Maharashtra Politics: राजकारणात यायचं स्वप्न भंगलं! ७१ उमेदवारांचा ‘पत्ता कट’; कारण काय?

Pune ZP Election 2026: शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी 
3

Pune ZP Election 2026: शिरूर तालुक्यात उमेदवारीवरून गोंधळ; पक्षाने उमेदवारी नाकारताच नेत्यांनी निवडली अपक्ष उमेदवारी 

Junnar Politics : जुन्नरमध्ये जिल्हा परिषद 8 जागांसाठी 50 तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 90 अर्ज दाखल
4

Junnar Politics : जुन्नरमध्ये जिल्हा परिषद 8 जागांसाठी 50 तर पंचायत समितीच्या 16 गणांसाठी 90 अर्ज दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.