Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरीच्या बहाण्याने 11 डॉक्टरांची फसवणूक; प्रत्येकी 10 लाखांना गंडा

एमडी आणि एमएस शिक्षण घेतलेल्या 28 डॉक्टरांची कायमस्वरूपी निवड केली जाणार होती. त्यासाठी कार्यरत असलेल्या कंत्राटी डॉक्टरांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2026 | 01:18 PM
नोकरीच्या बहाण्याने 11 डॉक्टरांची फसवणूक; प्रत्येकी 10 लाखांना गंडा

नोकरीच्या बहाण्याने 11 डॉक्टरांची फसवणूक; प्रत्येकी 10 लाखांना गंडा

Follow Us
Follow Us:
  • कायमस्वरूपी नोकरीच्या आमिषाने ११ कंत्राटी डॉक्टरांची फसवणूक
  • प्रत्येक डॉक्टरकडून १० लाख रुपये घेतल्याचा आरोप
  • वर्षभरानंतरही नियुक्ती न झाल्याने डॉक्टरांनी एसीबीकडे तक्रार
पुणे : महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 11 कंत्राटी डॉक्टरांची प्रत्येकी 10 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. पुणे महापालिकेने चार वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज सुरू केले असून, सुरुवातीला येथे कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती केली होती. मात्र, वर्षभरापूर्वी कायमस्वरूपी प्राध्यापकांची भरती करण्याचा निर्णय झाला होता.

एमडी आणि एमएस शिक्षण घेतलेल्या 28 डॉक्टरांची कायमस्वरूपी निवड केली जाणार होती. त्यासाठी कार्यरत असलेल्या कंत्राटी डॉक्टरांकडून प्रत्येकी 10 लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. पैसे देऊनही वर्षभरानंतर 11 डॉक्टरांची नियुक्ती झाली नाही. त्यांनी दिलेले पैसे परत मागितले असता टाळाटाळ करण्यात आली. सुरुवातीला पीडित डॉक्टरांनी कॉलेजच्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या महापौरांकडे तक्रार केली. मात्र, तेथून दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी एसीबीचे दरवाजे ठोठावले.

याप्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या तीन डॉक्टरांची नावे या तक्रारीत नमूद केले आहेत. गंभीर प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तात्काळ दखल घेतली आहे. एसीबीचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन-तीन दिवसांत सर्व तक्रारदार डॉक्टरांचे सविस्तर जबाब नोंदवले जातील. त्यानंतर या संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्तांकडे रीतसर परवानगी मागितली जाणार आहे.

FAQ

1. किती डॉक्टरांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे?
११ कंत्राटी डॉक्टरांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

2. प्रत्येक डॉक्टरकडून किती रक्कम घेतल्याचा आरोप आहे?
प्रत्येक डॉक्टरकडून १० लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

3. डॉक्टरांनी कुठे तक्रार केली?
दाद न मिळाल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली.

Web Title: 11 doctors defrauded under pretext of being provided with jobs nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Atal Bihari Vajpayee
  • medical colleges
  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

Pune Marathon : ‘पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी कशाला?’ मुरलीधर मोहोळांच्या मॅरेथॉनवरून रविंद्र धंगेकर आक्रमक
1

Pune Marathon : ‘पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी कशाला?’ मुरलीधर मोहोळांच्या मॅरेथॉनवरून रविंद्र धंगेकर आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.