Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Marathon : ‘पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी कशाला?’ मुरलीधर मोहोळांच्या मॅरेथॉनवरून रविंद्र धंगेकर आक्रमक

Pune Marathon : पुण्यातील 'रन फॉर युनिटी' मॅरेथॉनवरून राजकीय वातावरण तापलं आहे. पुणे महापालिकेने संस्कृती प्रतिष्ठानला 50 लाख रुपये दिल्याचा आरोप करत रविंद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ आणि महापालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 15, 2026 | 08:35 PM
Pune marathon

Pune marathon

Follow Us
Follow Us:
  • पुणे रन फॉर युनिटी मॅरेथॉनवरून राजकीय वाद
  • मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने मॅरेथॉनचं आयोजन
  • मॅरेथॉनवरून रविंद्र धंगेकर आक्रमक
 

Pune Marathon : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. मोहोळ यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती.

आता मात्र, या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेने दिलेल्या 50 लाख रुपयांच्या देणगीवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी सवाल उपस्थित केले आहेत.

50 लाखांच्या खर्चावरून धंगेकरांचा सवाल

रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महापालिका प्रशासनावर टीका केली. राज्यातील अनेक भाग दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना सरकारकडून निधीचा काटकसरीने वापर केला जात असल्याचं सांगितलं जातं. मग पुणे महानगरपालिकेने मॅरेथॉनसाठी संस्कृती प्रतिष्ठानला तब्बल 50 लाख रुपये देणगी का दिली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Rohit Pawar : पुणे रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या; रोहित पवारांची मागणी

पुणेकरांच्या करातून जमा होणारा पैसा अशा कार्यक्रमांसाठी खर्च करण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना कोणी दिला, असा थेट प्रश्नही धंगेकर यांनी विचारला.

नेत्यांच्या ब्रँडिंगसाठी पुणेकरांचा पैसा?

मॅरेथॉनचं आयोजन कमी खर्चातही करता आलं असतं. मात्र, 50 लाख रुपये देऊन राजकीय नेत्यांची चमकोगिरी करण्यासाठी सार्वजनिक पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. स्वतःच्या पैशातून अशा कार्यक्रमांचं आयोजन केल्यास आपली हरकत नसल्याचं सांगत त्यांनी दुष्काळी परिस्थितीत पुणेकरांच्या पैशांचा वापर करण्यावर आक्षेप घेतला.

नगरसेवकांच्या मानधनाचा मुद्दाही उपस्थित

धंगेकर यांनी यावेळी नगरसेवकांचं मानधन आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही मुद्दा उपस्थित केला. एका बाजूला खर्चात कपात केली जात असताना दुसरीकडे मॅरेथॉनसाठी 50 लाख रुपये देण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

तसंच, देशाच्या गृहमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे पुण्यातील मॅरेथॉनचा कार्यक्रम आता केवळ क्रीडा स्पर्धेपुरता मर्यादित न राहता राजकीय वादाचा विषय बनला आहे.

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे रन फॉर युनिटी मॅरेथॉनचं आयोजन कोणी केलं?

    Ans: केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने पुण्यात 'पुणे रन फॉर युनिटी' मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं.

  • Que: रविंद्र धंगेकर यांनी मॅरेथॉनवरून कोणता आरोप केला?

    Ans: पुणे महानगरपालिकेने संस्कृती प्रतिष्ठानच्या मॅरेथॉनसाठी 50 लाख रुपये देणगी दिल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. पुणेकरांच्या कराच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.

  • Que: रविंद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर काय टीका केली?

    Ans: मॅरेथॉनच्या माध्यमातून राजकीय नेत्यांचं ब्रँडिंग करण्यासाठी पुणेकरांचा पैसा वापरला जात असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. स्वतःच्या पैशातून कार्यक्रम केल्यास आपली हरकत नसल्याचंही ते म्हणाले.

Web Title: Pune run for unity marathon ravindra dhangekar muralidhar mohol controversy vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Marathon
  • Muralidhar Mohol
  • Pune Municipal Corporation
  • pune news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप
1

रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘या’ तारखेला एकदिवसीय संप

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…
2

Pune Metro ची सुसाट घोडदौड! आठ दिवसांत तब्बल ‘इतक्या’ लाख प्रवाशांचा प्रवास; वाहतूक कोंडीवर…

Amit Shah in Pune: अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण | Navarashtra
3

Amit Shah in Pune: अजितदादांच्या अर्धपुतळ्याचे अमित शाह यांच्या हस्ते अनावरण | Navarashtra

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
4

टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे-अक्कलकोट पालखी मार्गस्थ; 750 तरुणांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.