पुणे: पुण्यात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मागील तीन वर्षात १४ हजारे ७७४ पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोंदीमार्फत हा आकडा समोर आला आहे. यावरुन परदेशात स्थलांतर करणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत वाढ झाल्याचे लक्षात येते. परदेशात वाहन चालवण्यासाठी भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते.
यासाठी ती व्यक्ती देशातील ज्या ठिकाणी राहते, तेथील आरटीओकडून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. वाहनचालक परवाना (लायसन्स), व्हिसा अशा कागदपत्रांची तपासणी करुन आरटीओकडून परवाना दिला जातो. २०१८ पूर्वी ही प्रक्रिया मॅन्युअल पद्धतीने केली जात असे. त्यामुळे परवाना मिळवण्यासाठी वेळ लागत असे. नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली.
गतवर्षी ५,२७० पुणेकरांनी घेतला लाभ
अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन ‘सारथी’अंतर्गत अर्ज करावा लागतो. त्यानंतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी लागतात. आरटीओद्वारे अर्जदारांची कागदपत्रे तपासून एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. मागील तीन वर्षात हा परवाना काढण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२२-२३ मध्ये ४,२९४; २०२३ मध्ये ५,२१० आणि जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये ५,२७० पुणेकरांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला गेला आहे.
Driving License हरवल्यास काय करावे?
जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, तर तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला याबद्दलची सर्वात सोपी प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही सहजपणे पुन्हा एकदा DL बनवू शकता. चला याबद्दल जाणून घेऊया.
सर्वात पहिले तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्याची तक्रार दाखल करा. यावेळी एफआयआरची एक कॉपी स्वतःकडे सुद्धा ठेवा. याच कॉपीची पुढे अर्ज करण्यास गरज भासू शकते.
हेही वाचा: Driving Licence हरवल्यास काय करावे? जाणून घ्या नवीन DL मिळवण्याची सोपी प्रक्रिया
जिथून तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यात आला होता त्या RTO (Regional Transport Office) सोबत संपर्क साधा.
RTO कडून “डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स” साठी अर्ज फॉर्म (Form LLD) मिळवा. हा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडा.
डुप्लिकेट परवान्यासाठी शुल्क भरा. हे शुल्क राज्यानुसार बदलण्याची शक्यता आहे.
बायोमेट्रिक्स आणि व्हेरिफिकेशन
तुमचा फोटो आणि बायोमेट्रिक तपशील आरटीओ कार्यालयात घेतला जाईल. तुमचे डॉक्युमेंट तपासले जातील आणि पडताळले जातील.
डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा
व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल.
हा परवाना सहसा 7-15 कामकाजाच्या दिवसांत उपलब्ध होतो.