जम्मू-काश्मीरमध्ये अडकले पुण्यातील १५० पर्यटक,Pahalgam Terror Attack
जम्मू-काश्मीरमधील पहलगामध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यात Pahalgam Terror Attack २६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पर्यटकांमध्ये डोंबिवलीतील तीन, पुण्यातील दोघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातूनही शेकडो पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. त्यातील १५० जण अडकले असून हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत.
Pahalgam Terror Attack: किती धोकादायक आहे ‘TRF’ संघटना? दहशतवाद्यांचे लादेन कनेक्शन? वाचा सविस्तर…
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पुण्यातील दोन पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान हल्ल्यानंतर जे पर्यटक तिथे अडकले आहेत, त्यांना सुखरूप आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीनगर ते दिल्ली विशेष विमानाने त्यांना आणण्यात येईल, आज शक्य झालं नाही तर, उद्या त्यांना सर्वांना आणू, असं आश्वासन मोहोळ यांनी दिलं. श्रीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवरून संपर्कात असून मी माहिती घेत आहे. गृह विभागाच्या अधिकारी मदत करण्याचं काम करत आहेत. पुण्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही माहिती घेतली आहे. नातेवाइकांनी काळजी करू नये. आम्ही सगळे सोबत आहोत, असंही ते म्हणाले.
पालकमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. अजित पवार यांनी देखील पुण्यातील सर्व पर्यटकांची माहिती घेतली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या रुपाली ठोंबरे यांच्याकडूनही माहिती घेण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले आहेत. ते आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर हायलेवल मिटींग; मोदी सरकार नेमकं करतय काय?
श्रीनगरच्या जिल्हा प्रशासनाने जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांना आपत्कालिन परिस्थितीत संपर्क साधता यावा, यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात 24×7 मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, तिथे संपर्क करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
२) व्हॉट्सअॅप : 7006058623, 7780805144, 7780938397