Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे-दौंड डेमोच्या चाकांना अचानक आग, प्रवाशांमध्ये घबराट; पाटस रेल्वे स्थानकात काय घडलं?

पुणे-दौंड डेमो गाडीच्या चाकांना सोमवारी संध्याकाळी पाटस रेल्वे स्थानकात अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 12, 2026 | 04:32 PM
पुणे-दौंड डेमोच्या चाकांना अचानक आग, प्रवाशांमध्ये घबराट; पाटस रेल्वे स्थानकात काय घडलं?

पुणे-दौंड डेमोच्या चाकांना अचानक आग, प्रवाशांमध्ये घबराट; पाटस रेल्वे स्थानकात काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पाटस : पुणे-दौंड डेमो गाडीच्या चाकांना सोमवारी संध्याकाळी पाटस रेल्वे स्थानकात अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी सुमारे एक ते दीड तास प्रवासी गाडीतच अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पुणे वरुन दौंड ला जाणाऱ्या डेमो गाडी सोमवारी ( दि ११) संध्याकाळी ९ वाजून ३० मिनिटाच्या आसपास डेमो गाडी पाटस रेल्वे स्थानकात आली असता, गाडीच्या एका डब्याच्या चाकांजवळून अचानक जाळ आणि धूर येऊ लागला. काही क्षणातच चाकांना आग लागल्याचे दिसून आले. स्थानकावरील प्रवाशांनी आरडाओरड केल्याने गाडी तात्काळ थांबवण्यात आली. आणि प्रवाशांनी गाडीच्या बाहेर उड्या मारुन रेल्वे स्थानकावर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर भयभीत प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

ही आग कशामुळे लागली हे मात्र समजु शकले नाही. आग विझवण्यासाठी व तांत्रिक तपासणीसाठी गाडी तब्बल दीड तास स्थानकातच उभी होती. दरम्यान, दौंड येथे घराची ओढ लागलेल्या प्रवाशांना रात्रीच्या वेळी गाडीतच आणि रेल्वे स्थानकावर लटकत राहावे लागले. पिण्याच्या पाण्याची व इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले. स्थानिक नागरिक व रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन यंत्रणेच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वेळीच आग विझवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती प्रवाशांनी व्यक्त केली.

दरम्यान, गाड्यांची योग्य देखभाल होत नसल्याने तसेच रेल्वे प्रशासनाचे कसलेही नियंत्रण नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. ‘देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष, स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची दिरंगाई यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे,’ अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली. रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन डेमो गाड्यांची तातडीने तपासणी करावी व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. प्राथमिक अंदाजानुसार ब्रेक बाईंडिंगमुळे चाके गरम होऊन आग लागली असावी. रेल्वे विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पोलीस दलासाठी मोठी बातमी! ५,४५९ घरांसाठी १७६८ कोटींचा निधी मंजूर; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Web Title: A shocking incident has occurred when the wheels of the pune daund demo train caught fire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • indian raiway
  • Patas
  • Patas News

संबंधित बातम्या

दौंड तालुक्यात मान्सूनच्या हुलकावणीने पेरणी, लागवडी रखडल्या; शेतकरी चिंतेत
1

दौंड तालुक्यात मान्सूनच्या हुलकावणीने पेरणी, लागवडी रखडल्या; शेतकरी चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.