
Amol Balwadkar is confident that the NCP candidate will win in ward number 9 pmc elections 2026
PMC Elections 2026 : पुणे: प्रभाग क्रमांक ९ मध्ये (Maharashtra Local Body Elections) गेली तब्बल ११ वर्षे सातत्याने केलेल्या कामाची जनता नक्कीच पोचपावती देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व चारही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला आहे. (PMC Elections 2026)
प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांमध्ये गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे चौघेही रिंगणात आहेत. ही निवडणूक स्वतः प्रभागातील नागरिकांनीच आपल्या हातात घेतली असल्याचे चित्र दिसत आहे.
हे देखील वाचा : अजब गजब! मुदत संपली तरी प्रचार करता येणार; Election Commission च्या ‘या’ निर्णयाने नवीन वाद
प्रभागात दीर्घकाळ सातत्याने राहून काम करताना बालवडकर यांनी अनेक जनोपयोगी उपक्रम राबवले. बाणेर–बालेवाडीत संपर्क कार्यालयांद्वारे नागरिकांच्या कागदपत्रांपासून (आधार, PAN इ.) दैनंदिन अडचणींपर्यंत लाखो कामे मार्गी लावली. गेले ४ वर्षे २५ हून अधिक ट्रॅफिक वॉर्डनच्या माध्यमातून वाहतूक कोंडी कमी करण्याची जबाबदारी घेतली. मिशन निर्मलच्या माध्यमातून १०० दिवसांत १०० किमी परिसर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम राबवला. सलग १० वर्षे तब्बल १५ हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम वाटप करून कोणतेही घर दिवाळीत अंधारात राहू नये याची काळजी घेतली.
याशिवाय प्रभागात २४x७ पाणी योजनेची अंमलबजावणी, सुस–पाषाण खिंड पूल, स्मार्ट स्ट्रीट व स्मार्ट लाईट्स, ओपन जिम, झाडे व हरित उपक्रम, बाणेर येथील मनपा रुग्णालयाची उभारणी, QRT – Quick Response Team च्या माध्यमातून रस्ते–पाणी–ड्रेनेज–स्ट्रीटलाइट अशा दैनंदिन तक्रारींवर जलद निर्णय, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम, क्रीडा व युवा कार्यक्रम, योगा डे, मॅरेथॉन असे अनेक विकास आणि जनसंपर्क उपक्रम सातत्याने राबवले गेले आहेत.
हे देखील वाचा : महायुतीच्या सभेमध्ये रवींद्र चव्हाणांचा लुंगी लूक; रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा घणाघात
या पार्श्वभूमीवर बोलताना अमोल बालवडकर म्हणाले, “या संघर्षाच्या काळात प्रभागातील जनतेने मला जेवढं प्रेम दिलं, साथ दिली आणि खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली, ते माझ्यासाठी भाग्याचं आहे. जनतेला माझं काम माहिती आहे – संपर्क कार्यालय, ट्रॅफिक वॉर्डन, मिशन निर्मल, १० वर्षे १५ हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम, २४x७ पाणी योजना आणि अशी अनेक कामं त्यांच्या डोळ्यासमोर आहेत. जनतेचा विश्वास माझ्या पाठीशी ठाम आहे आणि हाच जनविश्वास माझी खरी ताकद आहे. याच बळावर प्रभाग ९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चौघेही उमेदवार विजयी होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”