नगरसेवकांचा निधी कापण्याच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. या प्रकरणात स्वतः लक्ष घालावं, अशी मागणी केली आहे.
सत्ताधारी भाजपने नगरसेवकांचा निधी काढून घेतल्याच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने महापालिकेत आंदाेलन केले. सत्ताधारी हुकुमशाही करीत असल्याचा आराेप यावेळी केला आहे.
महानगरपालिकेचा विकास निधी हा कोणत्याही व्यक्तीचा नसून नागरिकांच्या करातून त्यांच्या सुविधांसाठी उपलब्ध होणारा निधी आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील रद्द करण्यात आलेल्या विकासकामांच्या निधीचा निर्णय तातडीने मागे घेऊन सर्व…
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुणे शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी तिरंगा रॅलीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागासाठी प्रस्तावित असलेल्या सुमारे ४० कोटी रुपयांच्या निधीवरून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर चांगलेच आक्रमक झाले होते.
पुणे महापालिकेचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नावावर मत मागणारे चंद्रकांत दादा आपण कुठे आंबे चोरत आहात? असा उपरोधिक सवाल बालवडकर यांनी विचारला आहे.
बाणेर-बालेवाडी परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा हा केवळ तांत्रिक बिघाडाचा प्रश्न नसून रखडलेल्या सबस्टेशन प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या गंभीर नियोजन शून्यतेचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बाणेर येथे उभारण्यात आलेले महापालिकेचे सुमारे ४० काेटी रुपयांचे रुग्णालय एका संस्थेला पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर चालविण्यास दिल्याचा आराेप नगरसेवक अमाेल बालवडकर यांनी सर्वसाधारण सभेत केला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका कथित भोंदू व्यक्तीसोबतच्या फोटोवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, नगरसेवक अमोल बालवडकर यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व चारही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा ठाम विश्वास माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांचा सविस्तर “प्रगती अहवाल” प्रकाशित करण्यात आला.
पुणे महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९ (सुस–बाणेर–पाषाण) सध्या पूर्णपणे हाय व्होल्टेज बनला असून, भाजपच्या उमेदवारी निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अमोल बालवडकर यांनी नागरिकांशी सतत संवाद ठेवण्याचा आणि प्रभागाच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करण्याचा पुनरुच्चार करत “ही निवडणूक जनतेच्या प्रश्नांवर आणि विकासाच्या निकषांवरच लढली जाईल,” असे सांगितले.
Pune Election: पुणे मनपा निवडणुकीत प्रभाग ९ मध्ये मोठा राजकीय भूकंप! भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल बालवडकरांविरुद्ध अजित पवारांच्या सभेतच 'दादा हाच का तुमचा वादा?' असे पोस्टर्स झळकले.