Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर जिल्ह्यात संत तुकाराम महाराज पालखीचे आगमन; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन

'चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी...' असा हरी नामाचा गजर करत सर्व वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 01, 2025 | 03:00 PM
संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन

संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन

Follow Us
Follow Us:

अकलूज : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराटी येथून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सोलापूर जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले.

‘चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…’ असा हरी नामाचा गजर करत सर्व वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.

हेदेखील वाचा : Pune News: मानाचा चौथा गणपती असलेले तुळशीबाग गणपती मंडळ साकारणार ‘मथुरेतील वृंदावन’

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रकाश महानवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, उपविभागीय अधिकारी अमित माळी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

हाती पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात आले. आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहेत. जणू हा भक्तीचा सागरच आहे. नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी साडेआठच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर पोलिस विभागाच्या बँड पथकानेही पालखीचे स्वागत केले.

पादुकांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन

तसेच यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला. तसेच पुणे जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे पालखीची भक्तीभावाने देवाण-घेवाण करण्यात आली.

हेदेखील वाचा : यंदा दगडूशेठ गणपतीला पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखावा; मंदिर सजावटीचे वासापूजन संपन्न

Web Title: Arrival of sant tukaram maharaj palkhi in solapur district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur News
  • Sant Tukaram Maharaj Temple

संबंधित बातम्या

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी
1

मोहोळ तालुक्याचा समावेश अपर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूरऐवजी सोलापूरमध्ये करावा; आमदार राजू खरे यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका
2

सातासमुद्रापार घुमला विठ्ठलनामाचा गजर! लंडनहून निघाली पंढरीची दिंडी; ११ देशांचा प्रवास करून विठुरायाच्या भेटीसाठी येणार पादुका

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी
3

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.