Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! पुण्यात भीषण अपघात; पिकअप रिव्हर्स आली अन् थेट…; ८ भाविकांवर काळाचा घाला

Pune Accident Marathi News: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील खेड येथे देवदर्शनाला गेलेल्या ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 11, 2025 | 06:13 PM
मोठी बातमी! पुण्यात भीषण अपघात; पिकअप रिव्हर्स आली अन् थेट…; ८ भाविकांवर काळाचा घाला
Follow Us
Close
Follow Us:

१. पुणे जिल्ह्यात भीषण अपघात
२. पिकअप रिव्हर्स येऊन दरीत कोसळली
३. ८ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

पुणे/प्रभाकर जाधव: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील खेड येथे देवदर्शनाला गेलेल्या ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुंडेश्वर येथे दर्शनाला गेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे जिल्झ्यातील ८ भाविकांवर काळाने घाला घातला आहे. खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दुर्दैवी घटना घडली आहे. कुंडेश्वरचा डोंगर चढताना भाविकांनी भरलेले एक वाहन (पिकअप) पलटी होऊन दरीत कोसळली. रिव्हर्स झालेली पिकअप ५ ते ६ वेळेस दरीत पलटी झाली. या दुर्घटनेत ८ महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे.

आज श्रावणातील तीसरा सोमवार निमित्ताने श्रद्धेने देवदर्शनासाठी निघालेला प्रवास क्षणात हृदय पिळवटून टाकणाऱ्या शोकांतिका ठरला. पाईट (ता. खेड) येथील ४० हून अधिक महिला भाविक दर्शनासाठी कुंडेश्वरकडे निघाल्या होत्या. मात्र सोमवारी सकाळी, नागमोडी वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि जीप तब्बल १०० फूट दरीत कोसळली. या भीषण अपघातात ८ महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३२ जणी गंभीर जखमी झाल्या आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

 अपघातग्रस्त जीपमध्ये एकूण जवळपास ४० महिला भाविक प्रवास करत होत्या. जखमींना तातडीने चांडोली ग्रामीण रुग्णालय तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. कुंडेश्वर घाट परिसर हा तीव्र चढ-उतार आणि नागमोडी वळणांसाठी ओळखला जातो. मात्र, थोडीशी चूकही येथे जीवघेणी ठरते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्थानिकांनी वाहतुकीदरम्यान सावधगिरीचे आवाहन केले आहे.

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृतांना श्रद्धांजली आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली जात आहे. अपघाताची वार्ता गावात पोहोचताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालयांकडे धाव घेतली. काहींचा जीव वाचला याचा दिलासा, तर काहींचा निरोप कायमचा झाल्याने डोळे पाणावले.

या देवदर्शनाचा शेवट शोकांतिका…
मृत महिला भाविकांची नावे पुढीलप्रमाणे…
शोभा ज्ञानेश्वर पापळ, सुमन काळूराम पापळ, शारदा रामदास चोरगे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मिराबाई संभाजी चोरगे, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर, शकुंतला तानाजी चोरघे.
“जखमी नागरिक” – हॉस्पिटलनिहाय यादी नावे पुढीलप्रमाणे… पाईट : अलका शिवाजी चोरघे, रंजना दत्तात्रय कोळेकर, मालुबाई लक्ष्मण चोरघे, जया बाळू दरेकर. पोखरकर हॉस्पिटल, राजगुरूनगर  : लता ताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ, जयश्री पापळ. गावडे हॉस्पिटल राजगुरूनगर : शकुंतला चोरगे, मनीषा दरेकर. शिवतीर्थ हॉस्पिटल राजगुरूनगर : लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करंडे, फसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे. केअर वेल हॉस्पिटल, चाकण: सिद्धी ज्ञानेश्वर पापळ.

Web Title: Big news tragic accident in pune kundeshwar pickup reverses and claims lives of 8 devotees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 05:22 PM

Topics:  

  • Accident Death
  • Pune
  • Pune Accident

संबंधित बातम्या

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत
1

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
2

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…
3

Accident News: रांजणगाव गणपती येथे दोन वेगवेगेळे विचित्र अपघात; दोन जणांचा मृत्यू तर…

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
4

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.