Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील भाजपच्या इच्छुकांची धाकधूक वाढली; ‘या’ मतदारसंघाबाबत निर्णय न झाल्याने उमेदवाराबाबत प्रश्न कायम

शहरातील आठ पैकी सहा मतदारसंघ हे भाजपच्या वाट्याला तर हडपसर आणि वडगांव शेरी हे दाेन मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला जाण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 22, 2024 | 02:35 AM
पुण्यातील भाजपच्या इच्छुकांची धाकधूक वाढली; 'या' मतदारसंघाबाबत निर्णय न झाल्याने उमेदवाराबाबत प्रश्न कायम

पुण्यातील भाजपच्या इच्छुकांची धाकधूक वाढली; 'या' मतदारसंघाबाबत निर्णय न झाल्याने उमेदवाराबाबत प्रश्न कायम

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: खडकवासला, कसबा आणि पुणे कॅन्टाेन्मेंट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जाहीर झाले नसल्याने इच्छुकांचे ‘टेन्शन’ वाढले आहे. यामध्ये दाेन विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. पुणे कॅन्टाेन्मेंट मतदारसंघातून काॅंग्रेसचे माजी राज्यमंत्री रमेश बागवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही सध्या रंगली आहे. तर मनसेची पुण्यात काय भुमिका ठरणार यावरच बरेच चित्र अवलंबून असेल.

पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघातील विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. विद्यमान  मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिराेळे यांची नावे पहिल्या यादीतच आल्याने त्यांनी सुस्कारा साेडला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विराेधात माजी नगरसेवकांनी दंड थाेपटले आहेत. त्यांच्या उमेदवारीला विराेध केला आहे, त्याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅग्रेसमधील एका स्थानिक नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देऊन त्याला उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. आमदार तापकीर यांनी पक्षीय पातळीवर बाजू मांडली आहे. खडकवासला मतदार संघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला द्यायचा आणि त्या बदल्यात वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला घ्यायचा अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याने या दाेन्ही मतदारसंघातील महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. या मतदारसंघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश वांजळे यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. मनसे, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे.

पुणे शहरातील राखीव मतदारसंघ असलेल्या पुणे कॅन्टाेन्मेट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांचे नाव पहिल्या यादीत नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या मतदारसंघातून काॅंग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहे. काॅंग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले अविनाश साळवे यांनीही उमेदवारीसाठी दावा केला असून, बागवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे . यामुळे भाजप काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघ हा पाेटनिवडणुकीमुळे गाजला हाेता. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघातील उमेदवाराचे नाव भाजपच्या उमेदवारांच्या पहील्या यादीत येत असते. परंतु यावेळी कसब्यात भाजपकडून काेण ? याची उत्सुकता आहे. पाेटनिवडणुकीतील उमेदवार हेमंत रासने हे पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत. तर शहराध्यक्ष धीरज घाटे, दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल, दिवगंत खासदार गिरीष बापट यांची सून स्वरदा हे देखील भाजपचे उमेदवार असू शकतात.

मनसे आठही जागी लढणार ?

मनसेकडून विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात अधिकृत भुमिका काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही. शहर मनसेकडून आठही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची तयारी केली गेली आहे. यामुळे पुणे शहरात मनसेचा मतदार असुन, त्याची भुमिका निर्णायक ठरु शकते.

शिंदे गटाचे काय ?

शहरातील आठ पैकी सहा मतदारसंघ हे भाजपच्या वाट्याला तर हडपसर आणि वडगांव शेरी हे दाेन मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला जाण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यात एकही जागा मिळण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा याकरीता शहराध्यक्ष नाना भानगिरे प्रयत्न करीत असुन, त्यास किती यश मिळणार हे दाेन दिवसांत स्पष्ट हाेईल.

Web Title: Bjp announced soon pune camp khadakwasla and kasba constituency soon for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2024 | 02:35 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti
  • Pune

संबंधित बातम्या

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
1

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
2

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

“आमच्याशी लढायचे असेल तर…”; ED च्या ‘त्या’ छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू
3

“आमच्याशी लढायचे असेल तर…”; ED च्या ‘त्या’ छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
4

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.