
"आमच्याशी लढायचे असेल तर..."; ED च्या 'त्या' छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू
पश्चिम बंगालमध्ये वर्षाअखेरीस होणार विधानसभा निवडणूक
ईडीच्या छापेमारीवरून ममता बॅनर्जी आक्रमक
ममता बॅनर्जी यांचा भाजपवर निशाणा
West Bengal Election: नवीन वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात अनेक राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. वर्षाअखेरीस पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात महत्वाची लढाई असणार आहे. भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असेल तर ममता बॅनर्जी आपले सरकार टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतील. दरम्यान आज पश्चिम बंगालमध्ये ईडी कारवाई झाल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.
आज ईडीने I-PAC कार्यालयावर छापेमारी केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ठेतया कार्यालयात दाखल झाल्या. तिथून त्यांनी भाजपवर टीका केली आहे. यंत्रणेच्या माध्यमातून बंगालचा डेटा आणि रणनीती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कारवाईमुळे पश्चिम बंगालमध्ये जितक्या जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठरवले होते ते आता शून्यावर येईल, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
ज्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे, त्या ठिकाणी तृणमूल कॉँग्रेसच्या महिला नेत्यांनी बंगालचे राज्यगीत गाऊन अनोख्या प्रकारे निषेध व्यक्त केला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आमच्याशी लढायचे असेल तर, लोकशाही पद्धतीने आम्हाला पराभूत करा. यंत्रणेच्या मागे लपू नका.” तपास यंत्रणा निवडणूक आणि आपल्या पक्षाशी संबंधित महत्वाचे कागदपत्र आणि कॉम्प्युटर आणि हार्डडिस्क जप्त करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला.
BJP master plan for west Bengal: ममता बॅनर्जींच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन
भाजपवर टीका करताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले, ‘बंगाली बोलणे हा गुन्हा असेल तर, काही लोकांनाच कशाला? राज्यातील सर्व 10 कोटी नागरिकांना तुरुंगात टाका. ईडीची कारवाई केवळ लोकशाहीला कमकुवत करण्यासाठी आणि यांच्या पक्षाची रणनीती चोरण्यासाठी केली जात आहे.’
आरा रा रा खतरनाक! 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; ‘या’ राज्यात चकमकीचा थरार; सर्च ऑपरेशन जारी
सत्तेला सुरूंग लावण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन
येत्या काही महिन्याच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आतापासूनच सुरूवात झाली आहे. पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी भाजपने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. यासाठी, तळागाळात संघटना मजबूत केली जात आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर आणि कामावर भाजप निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी १८ आणि १९ जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये दोन सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मालदा आणि हावडा येथे या सभा होऊ शकतात, अशी चर्चा आहे.