
पुणे: काशेवाडी- डायस प्लॉट प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी अविनाश बागवे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे ठळक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. व्यापारी वर्गाच्या (Pune Election) समस्या, स्थानिक नागरिकांचे दैनंदिन प्रश्न तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी राबवलेली कामे प्रभागाच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरली आहेत. त्याचा लाभ काँग्रेस पक्षाचे अन्य उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, रफिक शेख आणि दिलशाद शेख यांना होतांना दिसत आहे.
प्रभागातील भवानी पेठ, टिंबर मार्केट, लोखंड बाजार, नेहरू रस्ता, लोहियानगर व इतर व्यापारी संकुलांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या व्यापारी प्रश्नांकडे अविनाश बागवे यांनी विशेष लक्ष दिले. व्यापाऱ्यांच्या प्रमुख अडचणी जाणून घेऊन प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी समस्या सोडवण्यासाठी ठोस भूमिका घेतली.
भयानक आग; त्वरीत मदत
टिंबर मार्केटमध्ये दुकानांना २/ ३ वेळा मोठी आग लागली. त्यावेळी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करणे, स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यास मदत करणे, नंतर तातडीने पंचनामे करण्यासही सरकारी यंत्रणेला भाग पाडले.
GST संदर्भातील अडचणींवर मार्गदर्शन
जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक लहान व मध्यम व्यापाऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन बागवे यांनी त्याविरूध्द व्यापाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. मार्गदर्शनपर बैठकांचे आयोजन केले. त्यामुळे किचकट तरतुदी रद्द होऊन अनेक व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला.
व्यापारी संघटनांना सक्रिय पाठबळ
प्रभागातील व्यापारी संघटनांमधील अंतर्गत प्रश्न, सामूहिक अडचणी व वाहतूक कोंडीसारख्या समस्यांवर बागवे यांनी मध्यस्थी करत समन्वयाची भूमिका बजावली. व्यापारी व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करत त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले.
CCTV बसवून सुरक्षिततेला प्राधान्य
प्रभागातील भवानी पेठ, टिंबर मार्केट, नेहरू रस्ता, लोखंड बाजार व प्रमुख व्यापारी संकुलांमध्ये वाढत्या चोरी, गैरप्रकार व असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर अविनाश बागवे यांच्या पुढाकाराने CCTV कॅमेरे बसवण्यात आले. या कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी घटनांवर आळा बसण्यास मदत झाली असून, पोलिस तपासालाही याचा मोठा उपयोग होत आहे. व्यापारी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
“हा प्रभाग ४–० ने भाजपच्या पारड्यात…”; काय म्हणाले केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ?
पावसाळ्यातील अडचणींवर उपाय
पावसाळ्यात प्रभागातील व्यापारी संकुलांमध्ये पाणी साचणे, ड्रेनेज समस्या व वाहतुकीचे अडथळे निर्माण होत होते. या समस्यांची दखल घेत बागवे यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीच्या उपाययोजना राबवल्या. नाल्यांची साफसफाई, पाण्याचा निचरा व रस्त्यांच्या दुरुस्तीमुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
एकूणच, व्यापारी हितसंबंध, सार्वजनिक सुरक्षितता आणि नागरी सुविधा या तिन्ही आघाड्यांवर अविनाश बागवे यांनी केलेले काम प्रभागाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरत आहे. “कामातूनच विश्वास निर्माण होतो” हे सूत्र जपत त्यांनी केलेल्या या उपक्रमांचे प्रभागातील व्यापारी व नागरिकांकडून स्वागत होत आहे. त्यांच्या या कामाचा फायदा काँग्रेस पक्षाच्या संपूर्ण पॅनेलला होत आहे.