Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरगुती गॅसची चिंता नाही, पुढील 25 दिवसांत…; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत मोठी समस्या नसून, पुढील सुमारे २५ दिवसांत घरगुती सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल, असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 15, 2026 | 12:41 PM
घरगुती गॅसची चिंता नाही, पुढील 25 दिवसांत...; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

घरगुती गॅसची चिंता नाही, पुढील 25 दिवसांत...; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

Follow Us
Follow Us:
  • घरगुती गॅसची चिंता नाही
  • पुढील 25 दिवसांत पुरवठा सुरळीत होईल
  • मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा
पुणे : देशात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. घरगुती गॅस पुरवठ्याबाबत मोठी समस्या नसून, पुढील सुमारे २५ दिवसांत घरगुती सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल, असा दावा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा काल मुकुंदनगर येथील टिमविच्या संकुलात पार पडला. या सोहळ्यात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विद्यापीठाचे कुलपती डॉ. एस. श्रीकुमार यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. (विद्यानिधी) देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

 

एलपीजी टंचाईबाबत बोलताना ते म्हणाले, सध्या निर्माण झालेली परिस्थिती तात्पुरती असून, भारत सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालय या प्रश्नावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून घरगुती गॅसच्या पुरवठ्यात मोठा अडथळा येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंत म्हणाले की, सध्या काही भागात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि काही व्यावसायिक क्षेत्रांमध्ये गॅस उपलब्धतेची समस्या निर्माण झाली आहे. मात्र हा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गॅस टंचाईचा परिणाम काही प्रमाणात पर्यटन क्षेत्रावरही होत आहे. हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर त्याचा परिणाम झाल्यामुळे पर्यटन उद्योगावर अप्रत्यक्ष परिणाम जाणवत आहे. तरीही ही परिस्थिती तात्पुरती असून, पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत.

सावंत यांनी पुढे सांगितले की, अत्यावश्यक सेवा, रुग्णालये आणि सार्वजनिक सुविधा यांना गॅस पुरवठा प्राधान्याने केला जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर कमीत कमी परिणाम होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. घरगुती गॅसच्या बाबतीत मोठी अडचण नसून साठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढील काही आठवड्यांत पुरवठा पूर्णपणे नियमित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : कृषी क्षेत्रासमोर नवे आव्हान! बदलत्या परिस्थितीत शेतकरी अडचणीत

Web Title: Chief minister pramod sawant has responded regarding domestic gas cylinders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Gas Cylinder
  • LPG gas cylinder
  • Pramod Sawant

संबंधित बातम्या

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?
1

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?

LPG Cylinder बुकिंग अन् Payment महागणार? UPI च्या नव्या नियमांमुळे गॅस वितरकांची डोकेदुखी वाढली
2

LPG Cylinder बुकिंग अन् Payment महागणार? UPI च्या नव्या नियमांमुळे गॅस वितरकांची डोकेदुखी वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.