राज्यात भाजपा युतीचे लूटेरे सरकार, 40 टक्क्यांचे कमीशन...; विजय वडेट्टीवार यांची टीका
पुणे : काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेतून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
ओबीसी मतदार आपल्यापासून दूर गेला आहे, तो आपल्याला सोबत आणून कार्य करावे लागेल, त्यांना सोबत आणण्यासाठी नियोजन बद्ध प्रयत्न करावे लागतील, धर्मांधतेमुळे समाजात ऊूट पाडली जात आहे, पण धर्म हा संस्कारासाठी आणि सत्ता ही विकासासाठी असते, महाराष्ट्रातील सर्वात सर्वसमावेशक कार्यकारणीत भटक्या विमूक्त तसेच आदीवासीचा सहभाग वाढला आहे, मोंदींचा ग्राऊ खाली आला आहे, येत्या काळात राहूल गांधी देशाचे नेतृत्व करतील, असे विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवार म्हणाले.
काँगेसच्या नवनियुक्त पदाधिकारयांची दोन दिवसीय कार्यशाळेचे खडकवासला येथे उदघाटन झाले. यावेळी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , आमदार सतेज पाटील , माजी आमदार बाळासाहेब थोरात , आमदार विश्वजीत कदम , सचिव बी. एम. संदीप उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पदी नियूक्त झालेले सपकाळ यांनी सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आपला कार्यअहवाल प्रसिद्ध केला. तसेच युवक काँग्रेसचे नवनियूक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे व एनएसयूआय चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.
वडेटटीवार म्हणाले, काँग्रेसने सत्ता कधी सर्वोच्च मानली नाही, सर्वसामान्यांना डोळयासमोर ठेऊन कार्य केले. पण भाजपा माञ दोन उदयोगपतींसाठी सरकार चालवत आहे. लोकांना जोडण्याचे काम करा, तूमच्या पदाने नाही तर तुमच्या कामाने ओळख निर्माण करा. राज्यात भाजपा युतीचे लूटेरे सरकार आहे. भाजपाकडे प्रचंड सत्ता, ईडी व सीबीआय आहे. तसेच ४० टक्क्यांचे कमीशन देखील लाटले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक पदाधिकारयाने ५ स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी निवडून आणण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. महाराजांनी १८ पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले त्याप्रमाणे आपल्याला देखील लोकांना सोबत घेऊन कार्य करायचे आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले राज्य सरकारचा कारभार भयानक आहे, कोणी विधानमंडळात घुसून मारामारी करतो, तर कोण कँटीन मध्ये हाणामारी करतो. भ्रष्टाचार बोकाळला आहे, जनतेच्या मनात असंतोष आहे त्या प्रश्नांना घेऊन काम करा म्हणजे जनता आपल्याबरोबर येईल, असेही ते म्हणाले.