Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासवडमध्ये पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली! रात्री 8 नंतरही DJ च्या तालावर विसर्जन मिरवणुका

पुरंदर तालुक्यात गणेशोत्सव नेहमी आदर्श आणि उत्साह ठरत असतो. गेल्या बारा दिवसापासून सुरु असलेल्या गणेश उत्सवाची सांगता शांततेत झाली असली तरी बहुतेक मंडळानी रात्री आठनंतर विसर्जन मिरवणुका सुरु केल्यामुळे मिरवणुका रेंगाळल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 26, 2026 | 02:04 PM
सासवडमध्ये पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली! रात्री 8 नंतरही DJ च्या तालावर विसर्जन मिरवणुका

सासवडमध्ये पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली! रात्री 8 नंतरही DJ च्या तालावर विसर्जन मिरवणुका

Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदर तालुक्यात गणेशोत्सव नेहमी आदर्श आणि उत्साह ठरत असतो. गेल्या बारा दिवसापासून सुरु असलेल्या गणेश उत्सवाची सांगता शांततेत झाली असली तरी बहुतेक मंडळानी रात्री आठनंतर विसर्जन मिरवणुका सुरु केल्यामुळे मिरवणुका रेंगाळल्या. परिणामी रात्री १२ च्या वेळेचे बंधन पळताना अखेर पोलिसांना ठोस भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे काही गणेश मंडळांना ध्वनीविरहित विसर्जन करावे लागले.

सासवडमध्ये दरवर्षी विसर्जन मिरवणुका मोठ्या प्रमाणात होत असतात. गुरुवारी रात्रीपासून विसर्जन मिरवणुका असल्याने अनेक मंडळानी एक दिवस अगोदर बाप्पांना निरोप दिला होता. तर शुक्रवारी दिवसभर मिरवणुका चालतील असा अंदाज होता. मात्र संपूर्ण दिवसभर एक दोन मिरवणुका शांततेत पार पडल्या. या व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या मंडळाची मिरवणूक आली नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसभर बाजारपेठेतील रस्त्यावर शुकशुकाट होता.

शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मानाचा समजल्या जाणाऱ्या अमर मंडळाच्या श्रीं च्या पालखीतील विसर्जनाने सोहळ्याची सुरवात झाली. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी सचिन दोलताडे यांसह संजय चव्हाण व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. दरम्यानच्या काळात त्रिशूल सोसायटी, सेवालाल मंडळ, सोपाननगर मंडळ सह घरगुती गणेशाचे विसर्जन पार पडले.

त्यानंतर रात्री साडे आठ पर्यंत बाजारपेठेतील मुख्य मिरवणूक मार्गावर शुकशुकाट दिसत होता. सायंकाळी उशिरा विद्युत रोषणाईची गणेश मंडळे मुख्य रस्त्यावर येण्यास सुरुवात झाली. श्री दत्त, राजर्षी शाहू, आचार्य अत्रे, श्रीमंत नेताजी, श्रीनाथ, संत गोराकुंभार, जयहिंद मंडळ, स्वराज,  छत्रपती आदीं मंडळांचा यामध्ये समावेश होता. नेहमीप्रमाणे दत्त मंडळाची मिरवणूक लक्षवेधी झाली. रांगोळीतून प्रबोधन करणारे संदेश, पोतराज व कडक लक्ष्मी, ढोल पथक, राजकमल बँड, फटाके व सुंदर मयुर रथातील श्रीं ची मुर्ती व ओसंडून वाहणारा कार्यकर्त्याचा उत्साह यामुळे गणेश भक्तांच्या डोळ्यांचे पारणें फिटले. गोरा कुंभार, नेताजी, छत्रपती मंडळासह सर्वच मंडळाच्या मिरवणूका प्रेक्षणीय ठरल्या.

पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही गणेश मंडळानी मिरवणुका रस्त्यावर रेंगाळत ठेवल्यामुळे अखेर पोलिसांना ठोस भूमिका घ्यावी लागली. उशिरा येणाऱ्या मंडळांनी अखेर सव्वा बाराच्या सुमारास जय प्रकाश चौकात सामूहिक आरतीने सोहळ्याची सांगता केली. रात्री साडे बारानंतर मिरवणुका बंद केल्यामुळे चार ते पाच मंडळांना कोणत्याही वाद्यांचा वापर न करता विसर्जन करावे लागले.

दरम्यान अकराव्या दिवशी अनेक मंडळांनी विसर्जन केले. ॐ साई, महाराजा, संत सावतामाळी, साईनाथ, माऊली प्रतिष्ठान, तारादत्त पूर्व, अखिल मंडई, शिवदत्त, म्हाडा कॉलनी, सुवर्ण नगरी आदिंचा त्यात समावेश होता. सावतामाळी मंडळाची हत्तीवरील मिरवणुका तसेच ओम साई मंडळाचा रुद्र भैरव रथामधील मिरवणूक लक्षणीय ठरली.

हे सुद्धा वाचा : सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

पोलिसांच्या आवाहनाला गणेश मंडळांचा कोलदांडा

एका मंडळाचा अपवाद वगळता बाकी सर्व मंडळाच्या मिरवणुकीत गुलालाचा वापर झाला नाही. मात्र पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही डीजे बंदी झुगारत सगळ्यांच मंडळात डीजेचा वापर, बऱ्याच मडळांची बेसुमार फटाकेबाजी पाहायला मिळाली. मिरवणुका वेळेत पार पडाव्या यासाठी पोलिसांनी आवाहन करूनही गणेश मंडळानी पोलिसांच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

Web Title: Dj systems were used extensively during the ganesh immersion procession in saswad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • ganesh utsav
  • Pune Police
  • Saswad News

संबंधित बातम्या

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
1

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?
2

Crime News: गणपती विसर्जनाला गालबोट ,मंडळ अध्यक्षाचा मृत्यू; विसर्जन मिरवणुकीत अचानक काय घडलं?

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका
4

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.