शिवसेनेचे पुरंदरचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात सोमवारी ३० मार्च रोजी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत संपूर्ण देशात आणि राज्यात गॅस सिलेंडरचा विस्कळीतपणा झाल्याने प्रत्येकजण हवालदिल झाला आहे. जो तो पर्यायी मार्गाचा विचार करत आहे.
अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, भाजपच्या उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप या तब्बल 1091 मते घेऊन निवडून आल्या आहेत.
वादग्रस्त पोलिस हवालदाराचे तब्बल आठ महिन्यांच्या चौकशीनंतर निलंबन केले आहे. पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
सासवड नगरपरिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूकीचे चित्र दिवसेंदिवस रंगतदार होत चालले आहे. अनेक इच्छुकांनी स्वतःहूनच आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
कित्येक नावे दुसऱ्याच प्रभागात समाविष्ट केल्याने सासवडकर ग्रामस्थांचा उद्रेक प्रशासनाला पाहायला मिळाला. प्रशासनाच्या गलथान कारभारावर आक्षेप घेत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांतील १२८५ हेक्टर (३ हजार एकर) क्षेत्र संपादित होणार आहे. सुरुवातीला २८३२ हेक्टर क्षेत्रावर प्रकल्प निश्चित होता
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक विधान भवन पुणे येथे पार पडली. यावेळी बैठकीला जिल्ह्यातील आमदार खासदार, पुणे – पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बीड जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांना पाठबळ देणारे आका आणि बोका संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहेत. मात्र सासवड पोलीस ठाण्यातही एका आकाचे वास्तव्य असल्याचे दिसून येत आहे.
पोलीस स्टेशनच्या आवारात बेवारस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ही वाहने कमी करण्याचा निर्णय सासवड पोलिसांनी घेतला आहे. यासाठी बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.