Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिले पाढे पंचावन्न! जनजागृती, बैठका, आंदोलने तरीही पुण्यात DJ चा आवाज १२ डेसिबलने वाढला; लक्ष्मी रस्त्यावरील…

विसर्जन मिरवणुकीपूर्वीच डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, प्रत्यक्ष मिरवणुकीत ढोल-ताशा पथके, डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटामुळे मध्यवर्ती भाग अक्षरशः दणाणून गेला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 26, 2026 | 07:06 PM
pune ganpati visarjan

pune ganpati visarjan

Follow Us
Follow Us:
  • विसर्जन मिरवणुकीत आवाजाची ‘हद्द’ पार
  • लक्ष्मी रस्त्यावर सरासरी १०४.५ डेसिबलची नोंद
  • ‘सीओईपी’च्या पाहणीत  गतवर्षीपेक्षा १२ डेसिबलने वाढ
सुनयना सोनवणे / Pune Ganpati: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लक्ष्मी रस्त्यासह मध्यवर्ती भागात यंदा ध्वनिप्रदूषणाने पुन्हा गंभीर पातळी गाठल्याचे ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख दहा चौकांमध्ये मिरवणुकीदरम्यान सरासरी १०४.५ डेसिबल ध्वनीपातळीची नोंद झाली. गतवर्षीच्या ९२.६ डेसिबलच्या तुलनेत यंदा त्यात तब्बल १२ डेसिबलने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ध्वनिप्रदूषणाविरोधात (Pune Police) यंदा मोठ्या प्रमाणावर जनजागृती, आंदोलने आणि बैठका झाल्यानंतरही आवाजाची पातळी कमी होण्याऐवजी वाढली.

विसर्जन मिरवणुकीपूर्वीच डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, प्रत्यक्ष मिरवणुकीत ढोल-ताशा पथके, डीजे, डॉल्बी आणि ध्वनिक्षेपकांच्या दणदणाटामुळे मध्यवर्ती भाग अक्षरशः दणाणून गेला. सीओईपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे विभागप्रमुख महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समन्वयक मेहेर आणि आयुष यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान विविध वेळांमध्ये ध्वनीपातळीची नोंद केली. बेलबाग, गणपती, लिंबराज, कुंटे, उंब्र्या, गोखले, शेडगे, होळकर, टिळक आणि खंडोजीबाबा या चौकांमध्ये मोजमाप करण्यात आले.

Pune Ganpati Visarjan : पुण्यात 24 तासांनंतरही गणरायाचे विसर्जन बाकी, अनेक गणेश मंडळ विसर्जनाच्या प्रतिक्षेत

यंदा दुपारी चार ते मध्यरात्री बारा या कालावधीत ध्वनीची तीव्रता विशेष वाढली. सर्व चौकांची सरासरी ध्वनीपातळी दुपारी चार वाजता ११३.४ डेसिबल, रात्री आठ वाजता १११.९ डेसिबल, तर मध्यरात्री बारा वाजता ११२.६ डेसिबल नोंदली गेली. उंबऱ्या चौकात दुपारी चार वाजता ११५.२ डेसिबल, तर गोखले चौकात रात्री आठ वाजता ११५.४ डेसिबल इतकी पातळी नोंदली गेली.

लक्ष्मी रस्त्यावर कुठे किती आवाज?

चौक – सरासरी ध्वनीपातळी ( डेसिबल मध्ये)
होळकर चौक – १०६.८
शेडगे विठोबा चौक – १०६.३
टिळक चौक – १०५.५
गोखले चौक – १०४.४
खंडोजीबाबा चौक – १०४.२
उंबऱ्या चौक – १०४.१
बेलबाग चौक – १०४.०
लिंबराज महाराज चौक – १०३.५
गणपती चौक – १०३.३
कुंटे चौक – १०२.८
एकूण सरासरी – १०४.५

पाच वर्षांत पुन्हा वाढला आवाज

२०२२ : १०५.२ डेसिबल
२०२३ : १०१.२ डेसिबल
२०२४ : ९४.८ डेसिबल
२०२५ : ९२.६ डेसिबल
२०२६ : १०४.५ डेसिबल

मर्यादा अन् प्रत्यक्ष स्थिती 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्यावसायिक क्षेत्रासाठी दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल, तर निवासी क्षेत्रासाठी दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल मर्यादा आहे. सीओईपीच्या नोंदीतील १०४.५ डेसिबलची सरासरी पातळी या मर्यादांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात अधिक आहे.

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…

प्रशासनाचे नियोजनही दणदणाटात हरवले –

ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने केलेले नियोजन प्रत्यक्ष मिरवणुकीत कितपत प्रभावी ठरले, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चौकाचौकांत ध्वनीपातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा असण्याची अपेक्षा असतानाही अनेक ठिकाणी डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची चढाओढ सुरू असल्याचे चित्र दिसले. त्यातच रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे विसर्जन मिरवणुकीदरम्यान रुग्णवाहिकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे ध्वनिप्रदूषणासह मिरवणुकीच्या नियोजनावरही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Web Title: Dj volume ganpati visarjan procession increased 12 decibels compared last year coep report pune police

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • DJ Dance
  • DJ Speaker
  • Ganesh Visarjan
  • pune ganpati
  • Pune Police

संबंधित बातम्या

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न
1

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…
2

तुडुंब, तुडुंब नुसती गच्च भरली! गणेशोत्सवात Pune Metro मालामाल; 12 दिवसांत तब्बल 7 कोटी…

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
3

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी
4

Satara DJ Dolby Crackdown: डॉल्बी जप्तीवरून खासदार विरुद्ध पालकमंत्री! साताऱ्यात डीजेच्या आवाजावरून राजकीय जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.