Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बाप्पा, तू माझ्याच हातांनी घडलास!’; गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये अनुभवायला मिळतोय भक्तीचा खरा आनंद

Pune Ganeshotsav 2026: कार्यशाळेचे खरे यश मूर्ती तयार होण्यात नाही, तर ती घरच्या देव्हाऱ्यापर्यंत पोहोचण्यात आहे. बाजारातून तयार मूर्ती विकत घेण्याऐवजी स्वतःच्या हाताने घडवलेली पर्यावरणपूरक मूर्ती घरी बसवणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 16, 2026 | 01:54 PM
पुणे गणेशोत्सव 2026

पुणे गणेशोत्सव 2026

Follow Us
Follow Us:
  • कार्यशाळेपुरता बाप्पा की घरचा गणराया
  • हातांनी घडवलेली मूर्ती खरोखर घरात विराजमान होते का?
  • पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबरोबरच ‘आपल्या हातच्या’ बाप्पाची भावना
सुनयना सोनवणे/पुणे: ‘बाप्पा आपणच बनवायचा…’ या कल्पनेतच एक वेगळा आनंद दडलेला आहे. मातीचा गोळा हातात घेतल्यानंतर त्याला आकार देताना सोंड, कान, डोळे, मुकुट हळूहळू साकारतात आणि काही तासांच्या मेहनतीनंतर समोर येतो तो ‘आपल्या हातचा’ गणराया. गणपती आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी अशा गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. मात्र, कार्यशाळा संपल्यानंतर या मूर्तींचे काय होते? त्या घरच्या गणेशोत्सवात विराजमान होतात का, की कार्यशाळेपुरताच त्यांचा प्रवास मर्यादित राहतो?

शाळा, सामाजिक संस्था, सोसायट्यांपासून विविध गटांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यशाळांना लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. मूर्तिकाराच्या मार्गदर्शनाखाली माती मळण्यापासून मूर्तीला अंतिम आकार देण्यापर्यंतचा अनुभव घेताना सहभागी केवळ एक कलाकृती तयार करत नाहीत, तर मातीशी, कलेशी आणि पर्यावरणाशीही नाते जोडतात.

Pune Ganeshotsav: ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; पुण्यात मानाच्या गणपतींचे दिमाखात आगमन!

मात्र, कार्यशाळेचे खरे यश मूर्ती तयार होण्यात नाही, तर ती घरच्या देव्हाऱ्यापर्यंत पोहोचण्यात आहे. बाजारातून तयार मूर्ती विकत घेण्याऐवजी स्वतःच्या हाताने घडवलेली पर्यावरणपूरक मूर्ती घरी बसवणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढत आहे. मूर्ती साधी असली तरी त्यात स्वतःचा वेळ, मेहनत, कल्पकता आणि भावनांचा सहभाग असतो. त्यामुळे ती केवळ मातीची मूर्ती न राहता कुटुंबाच्या गणेशोत्सवाचा एक खास भाग बनते.

‘बाजारातून मूर्ती आणणे सोपे आहे; पण स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवून ती घरी विराजमान करणे हा वेगळाच अनुभव आहे. मुलांना यातून गणेशोत्सवाबरोबरच माती, कला आणि पर्यावरणाची ओळख होते. त्यामुळे कार्यशाळेचा उद्देश केवळ मूर्ती बनवणे नसून ती घरी नेऊन पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची सवय लावणे हा आहे.’
– अक्षय भंडारे, मूर्तिकार

‘आम्ही दरवर्षी बाजारातून मूर्ती आणायचो. यंदा मुलांनी स्वतः बनवलेली मूर्तीच घरी बसवायची असा आग्रह केला. मूर्ती थोडी साधी असली तरी ती आमच्या घरासाठी खास आहे.’
– सूरज जाधव, पालक

‘बाप्पाचे कान, सोंड आणि मुकुट बनवताना खूप मजा आली. माझ्या हाताने बनवलेला बाप्पा मी घरी ठेवला आहे. त्यामुळे मला तो बाजारातल्या मूर्तीपेक्षा जास्त आवडतो.’
– रेवती फाटक, कार्यशाळेतील सहभागी चिमुकली

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

‘कार्यशाळा संपल्यानंतर मूर्ती घरी जाते आणि तिच्यासोबत कार्यशाळेचा खरा संदेशही पोहोचतो. मातीचा बाप्पा घडवणे ही केवळ काही तासांची कला नाही, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी कलेच्या माध्यमातून मनाला आनंद देणारा आणि एकाग्रता वाढवणारा अनुभव आहे. स्वतःच्या हाताने घडवलेल्या बाप्पाला घरात स्थान देणे, त्याचे विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीने करणे आणि पुढील वर्षी पुन्हा अशीच मूर्ती बनवण्याची इच्छा निर्माण होणे, यातूनच या कार्यशाळेचे खरे यश मोजले जाते.”
– मौक्तिका केळकर, निमिष बर्वे,
कार्यशाळेच्या आयोजक, अलाइव हाईव्ह स्टुडीओ

Web Title: Eco friendly ganpati bappa idol making worksop enviornment care pune ganeshostav 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav 2026
  • pune ganpati

संबंधित बातम्या

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप
1

Ratnagiri: बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! टाळ-मृदुंगाच्या गजरात बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
2

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया
3

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया

Tasgaon Ganpati Rathotsav: तासगावच्या गणरायाचा २८७ वा रथोत्सव; पारंपरिक जल्लोषात निघाला भव्य रथ
4

Tasgaon Ganpati Rathotsav: तासगावच्या गणरायाचा २८७ वा रथोत्सव; पारंपरिक जल्लोषात निघाला भव्य रथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.