Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण; MPCB च्या चाचणीत एकही…

तज्ज्ञांच्या मते, वाढते ध्वनिप्रदूषण पक्षी, प्राणी आणि मानवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरत असून, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज अधिक भासू लागली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 22, 2025 | 02:35 AM
Diwali 2025: पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण; MPCB च्या चाचणीत एकही...

Diwali 2025: पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण; MPCB च्या चाचणीत एकही...

Follow Us
Close
Follow Us:

पर्यावरणस्नेही फटाकेही ठरले ध्वनिप्रदूषणाचे कारण
एमपीसीबी चाचणीत सर्व फटाके नापास
गोळीबार मैदानाशेजारील धोबी घाट येथे घेण्यात आली चाचणी

पुणे: दिवाळीच्या काळात वायू आणि ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पर्यावरणस्नेही फटाके तयार करण्यात आले. मात्र हे फटाकेही ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे ठरले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) नुकत्याच झालेल्या चाचणीत एकाही फटाक्याने निर्धारित मर्यादा पाळली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गोळीबार मैदानाशेजारील धोबी घाट येथे ही चाचणी घेण्यात आली. २० फूट अंतरावर आवाज मोजला असता पाचशेच्या लडीने सर्वाधिक ९९.३ डेसिबल, सिंगल शॉट फटाक्याने ८७.३ डेसिबल, लवंगीच्या २४ लडींनी ८५.३ डेसिबल, सुतळी बॉम्बने ७८.१ डेसिबल, सद्दाम ॲटमबॉम्बने ७६.३ डेसिबल, लक्ष्मी फटाक्याने ७१.९ डेसिबल, रॉकेटने ७२ डेसिबल, तर रंगीबेरंगी पावसाने ६६ डेसिबल इतका आवाज निर्माण केला.

निवासी क्षेत्रासाठी दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल ही मर्यादा असून, सर्व फटाके या मर्यादेपेक्षा अधिक आवाज करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फटाके वाजविणाऱ्यांवर कारवाई करायची की फटाके बनविणाऱ्या कंपन्यांवर, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढते ध्वनिप्रदूषण पक्षी, प्राणी आणि मानवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरत असून, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज अधिक भासू लागली आहे.

‘या चाचणीमुळे फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या आवाजाचे स्पष्ट चित्र समोर आले आहे. अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवून पुढील उपाययोजना ठरविण्यात येतील’
– बाबासाहेब कुकडे, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

Diwali 2025: दिवाळी सण माणसांसाठी आनंदाचा मात्र पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’; नेमके कारण काय?

दिवाळी सण पक्ष्यांसाठी ठरतोय ‘कर्दनकाळ’

दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण असला तरी फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे आणि विषारी धुरामुळे हा सण निसर्गातील सजीवांसाठी ‘कर्दनकाळ’ ठरतो आहे . शांत, निसर्गरम्य वातावरणात जीवन जगणाऱ्या पक्ष्यांना मोठ्या आवाजाची सवय नसते. दीपोत्सव सुरू होताच सर्वत्र फटाक्यांचा गडगडाट सुरू होतो. त्यातून निर्माण होणारे ध्वनी व वायू प्रदूषण प्राणी – पक्ष्यांच्या जीवावर बेतते.

झाडांवर विश्रांती घेत असताना अचानक फटाके फुटल्याने पक्षी घाबरून उडतात. अंधारात दिशाभूल होऊन इमारतींना, तारा किंवा झाडांना धडकतात आणि गंभीर जखमी होतात. काही मृत्युमुखी पडतात, तर अनेक बेघर होतात. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे त्यांच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो आणि काही पक्षी बहिरे होतात. हवेतील सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडसारखे घातक वायू त्यांच्या श्वसनसंस्थेत जाऊन श्वास घेण्यास त्रास निर्माण करतात, असे पशुवैद्य डॉ. कुणाल मुनाळे यांनी नवराष्ट्राशी बोलताना सांगितले.

Web Title: Even eco friendly crackers found to louder than the noise pollution limit in mpcb tests diwali 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Diwali 2025
  • Firecracker

संबंधित बातम्या

व्यक्तीने खरेदी केला 10 लाखांचा फटाका, फोडताच आकाशात दिसले असे अनोखे दृश्य… पाहून सर्वच झाले अचंबित; Video Viral
1

व्यक्तीने खरेदी केला 10 लाखांचा फटाका, फोडताच आकाशात दिसले असे अनोखे दृश्य… पाहून सर्वच झाले अचंबित; Video Viral

दिवाळीचे धार्मिक आणि सामाजिक महत्व काय? कोणत्या जुन्या परंपरा आजही जिवंत आहेत?
2

दिवाळीचे धार्मिक आणि सामाजिक महत्व काय? कोणत्या जुन्या परंपरा आजही जिवंत आहेत?

Samvat 2082 मध्ये बाजारात कमाईची मोठी संधी! गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपर्यंत परताव्याची शक्यता
3

Samvat 2082 मध्ये बाजारात कमाईची मोठी संधी! गुंतवणूकदारांना 15 टक्क्यांपर्यंत परताव्याची शक्यता

Delhi Air Pollution : दिल्लीकरांचा श्वास कोंडला! दिवाळीच्या मुहूर्तावर मोडला प्रदुषणाचा मागील चार वर्षांचा रेकॉर्ड
4

Delhi Air Pollution : दिल्लीकरांचा श्वास कोंडला! दिवाळीच्या मुहूर्तावर मोडला प्रदुषणाचा मागील चार वर्षांचा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.