Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा

नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुर्भे येथे 'कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प' उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 08, 2026 | 12:16 PM
Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा

Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा

Follow Us
Close
Follow Us:
  • नवी मुंबईसाठी मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय
  • आता कचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती
  • आमदार मंदा म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश
 

Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुर्भे येथे ‘कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प’ उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबईतील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर घरगुती व औद्योगिक कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे हे नवी मुंबई महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान ठरत होते.

ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईसाठी स्वतंत्र आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प असावा, असा ध्यास घेत अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू ठेवला होता. या अनुषंगाने त्यांनी २५ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र सादर करून तुर्भे येथे ‘कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प’ उभारण्याची ठोस मागणी केली होती.

Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात

या पत्रामध्ये नवी मुंबईतील वाढत्या कच-याच्या समस्येचा सविस्तर आढावा देत पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाययोजना म्हणून या प्रकल्पाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना या संदर्भात आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार डॉ. रवींद्र यांनी २५ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना प्रकल्पासंबंधी सविस्तर प्रस्ताव, स्वयंस्पष्ट अभिप्राय आणि आवश्यक कागदपत्रांसह सादर करण्याचे आदेश दिले.

या संपूर्ण प्रक्रियेचा सातत्याने पाठपुरावा करत अखेर ५ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापन व विल्हेवाटीसाठी, घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ अंतर्गत एकात्मिक प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करण्यासाठी मेरारों आर अॅड बी ग्रीनटेक एलएलपी या संस्थेला लेटर ऑफ अवॉर्ड (एलओए) देण्यात आले.

Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

या प्रकल्पासंबंधीची संक्षिप्त टिप्पणी, प्रशासकीय मंजुरी आदेश आणि एलओए देण्यात आल्याची अधिकृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी मुख्य सचिव डॉ. रवींद्र भराटे यांना सादर केली. लवकरच नवी मुंबई क्षेत्रात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याच्य शास्त्रोक्त व्यवस्थापनासाठी व त्यातून वीज निर्मितीसाठी हा एकात्मिक प्रकल्प सार्वजनिक-खाजगी लोकसहभागातून सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १८०० ते २००० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा प्रकल्प नवी मुंबईच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Web Title: Mla manda mhatre a waste to energy plant will be set up in turbhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • MLA Manda Mhatre
  • Navi Mumbai
  • panvel
  • pollution
  • Solid Waste Management

संबंधित बातम्या

दिल्ली नव्हे, देशातील ‘हे’ शहर ठरलं सर्वात प्रदूषित; श्वास घेणंही कठीण, रिपोर्टमध्ये खुलासा
1

दिल्ली नव्हे, देशातील ‘हे’ शहर ठरलं सर्वात प्रदूषित; श्वास घेणंही कठीण, रिपोर्टमध्ये खुलासा

Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…
2

Navi Mumbai Crime: सकाळी मद्यधुंद कारचा कहर; कारवर पोलिस लिहिलेले; आतमध्ये…

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक
3

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन
4

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.