Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 26, 2025 | 11:32 AM
Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

Big Breaking: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट

Follow Us
Follow Us:

पुणे:  राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील 15 चितळ प्रकारातील हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे प्राणी संग्रहालय प्रशासन आणि पुणे महानगरपालिकाही चक्रावून गेली आहे. प्राथमिक माहितीनुसार, यामागे एखाद्या साथीच्या आजाराची शक्यता वर्तवली जात असली तरी, अद्याप मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. प्राणीसंग्रहालयात एकूण 98 चितळ प्रकारातील हरणे होती, त्यापैकी 15 हरणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे 4 ते 5 दिवसांपासून हा प्रकार सुरु असताना महापालिका प्रशासाने हि माहिती सपवण्याच प्रय़त्न केल्याचे दिसून येत आहे.

मृत हरणांचे शवविच्छेदन (पोस्ट मार्टेम) क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या पशु रोग तज्ञांनी केले आहे. तसेच, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृत हरणांचे जैविक नमुने विभागीय वन्यजीव प्रशिक्षण केंद्र नागपूर, बरेली, भोपाळ आणि ओरिसा येथील भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेच्या अनुषंगाने आणखी एक महत्त्वाचा पैलू तपासला जात आहे. जर हा साथीचा रोग असेल, तर त्याचा मनुष्यावर काही परिणाम होऊ शकतो का, याचीही तपासणी केली जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क आहे.

गेल्या चार ते पाच दिवसात आमच्याकडील एकूण 16 हरणांचा अचानक मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे या घटनांच्या मृत्यूबाबत विविध पातळ्यांवर तपासणी केली जात आहे, शहरातील आणि शहराबाहेरील काही महत्त्वाच्या नामांकित प्रयोगशाळांना जैविक नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल तीन चार दिवसात आम्हाला प्राप्त होईल हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेमाचे नेमके कारण स्पष्ट होईल.

– डॉ. घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, राजीव गांधी

प्राणीसंग्रहालय, पुणे विधानसभेत आमदार रासनेंनी विचारला प्रश्न कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मागील मागील चार ते पाच दिवसांत तब्बल 15 हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विषाणूजन्य आजाराने हरणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आमदार हेमंत रासने यांनी हरणांच्या मृत्यूचा मुद्दा विधानसभेत मांडत प्रशासनाने इतर प्राण्यांना धोका होऊ नये, यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. “कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय गेली दोन दिवसात 15 हरणांचा अचानक मृत्यू झाला असून अद्याप पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही. साथीच्या रोगामुळे असे झाल्याची शक्यता आहे, त्यामुळे इतर प्राण्यांना त्याचा काही प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी तातडीने शासनाने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत” अशी मागणी रासने यांनी केली आहे.

Web Title: Fifteen deer death in rajiv gandhi zoo katraj pune forest department news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 09:39 PM

Topics:  

  • Forest Department
  • Pune
  • Wild Animals

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
2

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
3

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
4

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.