Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard Captured : मर्सिडीज-बेंझ कंपनीतील बिबट्या अखेर जेरबंद; थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश

चाकण वनपरिक्षेत्रातील मर्सिडीज-बेंझ कंपनीच्या प्रकल्प परिसरात शिरलेल्या बिबट्याला अखेर दोन दिवसांच्या थरारक शोधमोहीमेनंतर वन विभागाने रविवारी रात्री जेरबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 12, 2026 | 06:50 PM
मर्सिडीज-बेंझ कंपनीतील बिबट्या अखेर जेरबंद; थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश

मर्सिडीज-बेंझ कंपनीतील बिबट्या अखेर जेरबंद; थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश

Follow Us
Follow Us:
  • मर्सिडीज-बेंझ कंपनीतील बिबट्या अखेर जेरबंद
  • थरारक मोहिमेनंतर वन विभागाला यश
  • कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास
चाकण : चाकण वनपरिक्षेत्रातील मर्सिडीज-बेंझ कंपनीच्या प्रकल्प परिसरात शिरलेल्या बिबट्याला अखेर दोन दिवसांच्या थरारक शोधमोहीमेनंतर वन विभागाने रविवारी रात्री जेरबंद केले आहे. विशाल उत्पादन प्रकल्पाच्या परिसरात लपून बसलेल्या या बिबट्यामुळे कंपनीत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीचा उत्पादन विभागही दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. शनिवारी सकाळी कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रफितीत हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात फिरताना दिसून आला होता. त्यानंतर वन विभाग, ‘रेस्क्यू’ चॅरिटेबल ट्रस्ट आणि ‘वाइल्डलाइफ एसओएस’च्या पथकांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. मात्र, मर्सिडीज-बेंझसारख्या विस्तीर्ण उत्पादन प्रकल्पात बिबट्याचा ठावठिकाणा शोधणे वन अधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले.

 

अखेर सोमवारी (ता. ११) दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर भक्ष्याच्या शोधात फिरत असताना बिबट्या कंपनी परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. पकडण्यात आलेला बिबट्या सुमारे साडेतीन ते चार वर्षांचा प्रौढ नर असल्याची माहिती वन विभागाने दिली. ही संपूर्ण मोहीम पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे, जुन्नर उपवनसंरक्षक प्रशांत खाडे आणि सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कांक, वन कर्मचारी इंदलकर, जगताप, पिसाळ तसेच संपूर्ण चाकण वन विभागाच्या पथकाने मोहिमेत सहभाग घेतला.

हे सुद्धा वाचा : पुणे-दौंड डेमोच्या चाकांना अचानक आग, प्रवाशांमध्ये घबराट; पाटस रेल्वे स्थानकात काय घडलं?

कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला

याशिवाय माणिकडोह बचाव केंद्राचे महेंद्र धोरे व डॉ. अविनाश विसाळकर, ‘रेस्क्यू’ चॅरिटेबल ट्रस्टचे नचिकेत उत्पात, किरण रहाळकर, एजाज शेख आणि त्यांच्या पथकानेही महत्त्वाची भूमिका बजावली. म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय ढमाले तसेच मर्सिडीज-बेंझ प्रशासनाचे सारंग जोशी आणि व्यंकटेश कुलकर्णी यांनीही मोहिमेस सहकार्य केले. दोन दिवसांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले. कंपनीतील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Web Title: Forest department captures leopard from mercedes benz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • Chakan News
  • Leopard
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
1

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
2

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी  अन्…
4

Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.