पुणे: राज्यभरात पावसाने तुफान बॅटिंग सुरू केली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. पुण्यात देखील पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाने झालेल्या स्थितीचा आढावा घेतला.
बारामतीमध्ये देखील निरा डावा कालवा फुटल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने पुणे जिल्हा आणि अन्य भागात रेड अलर्ट जारी केला आहे. अति ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंदापूर, दौंड आणि बारामती क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे.
पुणे जिल्हा आणि शहर, पश्चिम महाराष्ट्र, कोकण प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. बारामतीमध्ये 5 दिवसांत ३१४ मिमी इतका पाऊस झाला आहे.
कोकणात मुसळधार
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मुसळधार पावसाने राज्यभर बॅटिंग केली आहे. विदर्भ, मराठवाडा मधील जिल्ह्यात देखील तुफान पाऊस सुरू झाला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
कोकणात पावसाचा हाहाःकार
कोकणात पावसाची तुफान बॅटींग सुरु आहे. अशातच आता कर्जत तालुक्यातील बिरदोले गावातील 27वर्षीय तरुण रोशन कचरू कालेकर या तरुणाचे अंगावर वीज पडल्याने त्याचा अपघाती मृत्यू झाला.उल्हास नदी जवळ शेती असल्याने रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पुर आला होता.या पुरामध्ये शेतीचे कोणते नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी हा तरुण गेला असताना ही दुर्घटना घडली.
नेरळ कळंब रस्त्यावरील बिरदोले या गावाच्या मागील बाजूने उल्हास नदी वाहते.रात्री सर्वत्र ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने उल्हास नदीला अचानक पूर आला.आज पहाटे सर्वांना जाग आली ती विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट यातून जाग आली.त्यावेळी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू होता.
Rain Update : कोकणात पावसाचा हाहाःकार; अंगावर विज पडल्याने तरुणाचा मृत्यू
गावाच्या कडेला उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी आपल्या शेतात आल्याने आणि त्यातून शेतीचे किती नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी रोशन कालेकर हा तरुण सकाळी सात वाजता छत्री घेवून घरातून बाहेर पडला होता. त्यावेळी देखील आकाशात विजा चमकत होत्या आणि ढग गडगडत होते.मात्र तरी देखील शेती पाहण्यासाठी गेलेला रोशन पुन्हा घरी परत आला नाही.सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास रोशन कचरू कालेकर या रंगकाम ठेकेदाराकडे काम करणाऱ्या तरुणाच्या अंगावर वीज कोसळली.त्या विजेच्या प्रवाहात रोशन त्याच ठिकाणी कोसळला आणि विजेचा झटका इतका प्रचंड होता की त्या विजेच्या झटक्यात जागच्या जागी जीव गेला.