Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indapur Crime : हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा

Indapur Crime : इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ‘हुंडा देता आला नाही’ असे म्हणत पतीसह सासू-सासऱ्यांकडून शिवीगाळ व मारहाण होत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 04, 2026 | 09:29 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर काही दिवसांनी सुरू झाला कथित छळ
  • छळामुळे मुलीला तीन-चार वेळा माहेरी आणले
  • पती-सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा; पोलिसांचा पुढील तपास सुरू
Indapur Crime :इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे साडेपाच महिन्यांची गर्भवती असलेल्या २१ वर्षीय विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या कथित छळाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मयत पीडित सोनाली समाधान चंदनशिवे, रा. वडापुरी, ता. इंदापूर असे मृत विवाहितेचे नाव असून या प्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी हनुमंत श्रीपती बनसोडे (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. कन्हेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पुण्यात ‘सेंटिएंट’ बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी; फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन

लग्नानंतर काही दिवसांनी सुरू झाला कथित छळ

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, त्यांची मुलगी सोनाली हिचा विवाह दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे, रा. वडापुरी, ता. इंदापूर याच्यासोबत रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. लग्नाच्या वेळी आरोपींकडून एक लाख रुपये हुंड्याची मागणी करण्यात आली होती; मात्र ती पूर्ण करता आली नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

लग्नानंतर काही दिवस सासरच्या मंडळींनी मयत पीडितेला व्यवस्थित नांदविले. मात्र त्यानंतर सासू पार्वती हिने घरकाम येत नसल्याचे सांगत, तसेच “माझ्या कार्तिकचे वाटोळे केलेस, तुझ्या बापाला हुंडा देता आला नाही” अशा शब्दांत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे.

तसेच पती समाधान हा मयत पीडितेवर संशय घेत “तू माझ्या आयुष्यात का आलीस?” असे म्हणत मारहाण करत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. सासरा गौतम हाही पत्नीच्या सांगण्यावरून मयत पीडितेला बोलून व मारहाण करून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

छळामुळे मुलीला तीन-चार वेळा माहेरी आणले

सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित त्रासामुळे आपण मुलगी मयत पीडितेला तीन ते चार वेळा माहेरी घेऊन गेलो होतो, असेही तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. मात्र त्यानंतरही तिचा सासरी छळ सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

३ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १२ वाजता पती समाधान याने मयत पीडितेच्या माहेरच्यांना फोन करून “सोना कसतरीच करतीय, लवकर या” असे सांगितले. त्यानंतर नातेवाईक कुंडलिक माने यांनी फोनवरून मयत पीडितेला इंदापूर येथील सरकारी दवाखान्यात नेल्याचे कुटुंबीयांना सांगितले.

कुटुंबीय दवाखान्यात पोहोचले असता डेड हाऊसमध्ये मयत पीडितेचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्यावर व्रण असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मयत पीडितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांना समजले. विशेष म्हणजे, ती साडेपाच महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

‘पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था…’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis नेमके काय म्हणाले?

पती-सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा; पोलिसांचा पुढील तपास सुरू

मयत पीडितेचा पती, सासू आणि सासरा यांनी तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन हुंड्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या फिर्यादीवरून इंदापूर पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून इंदापूरचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपी पती आणि सासरे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे – विलास नाळे (पोलीस निरीक्षक) साडेपाच महिन्यांची गर्भवती असलेल्या तरुण विवाहितेच्या मृत्यूने वडापुरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणातील आरोपांची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

Web Title: Indapur crime pregnant married woman commits suicide due to dowry harassment case registered against husband and in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • Domestic Violence
  • Indapur Crime
  • indapur news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.