Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News : एनव्हीडियाला मोठा धक्का; जेन्सन हुआंग यांचा CEO पदाचा तात्काळ राजीनामा ,अमेरिकन शेअर बाजार आदळला

Breaking News : एनव्हिडियाचे सहसंस्थापक आणि CEO जेन्सन हुआंग यांनी तात्काळ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी कोलेट क्रेस यांची अंतरिम CEO म्हणून नियुक्ती झाली. या अनपेक्षित नेतृत्वबदलामुळे अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक घसरले असून AI उद्योगात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 12, 2026 | 09:34 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ३३ वर्षाच्या नेतृत्वाचा अचानक शेवट
  • राजीनाम्याच्या बातमीने शेअर बाजारात भूकंप
  • राजीनाम्याची तीन प्रमुख कारणे
Breaking News : अमेरिका आणि चीन यांच्यातील महासत्तेचे खुले आणि लपून सुरु असलेले युद्ध कोणत्या टोकाला जाईल याबद्दल काहीच सांगता येणार नाही . चीन आणि अमेरिकेत तंत्रज्ञान याला घेऊन एक मोठा संघर्ष सुरु आहे . अमेरिकेने चीनवर तंत्रज्ञानाला लागणाऱ्या काही महत्वाच्या वस्तूंची बंदी घातली आहे . जगातील कोणताही देश चीनला लागणारी वस्तू अमेरिकेला विचारल्याशिवाय विकू शकत नाही .

यावर मात करत चीन सुद्धा स्वतःला स्वावलंबी बनवत तर आहेच पण अजूनही चीनकडे काही गोष्टींची कमतरता आहे . जसे कि चिपनिर्मिती , अजूनही काही चिपसाठी चीनला अमेरिकेवर अवलंबून राहावे लागत आहे . अशातच जगातल्या सर्वात मोठ्या आणि आघाडीवर असणाऱ्या एनव्हीडीया या कंपनीच्या CEO पदावर असणाऱ्या जेन्सन हुआंग यांनी अचानक एक दिवस आपल्या ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना एक मेल केला आणि सांगितले कि त्यांनी त्यांच्या बायकोला फसवलं आहे . त्यांचे इतर दोन महिलेंसोबत अनैतिक संबंध आहेत .

त्यांनी त्यांच्या पत्नीवर हा अन्याय केला आहे . या मेल नंतर अमेरिकेत एकच खळबळ उडाली आणि समोर एक आणखीच धक्कादायक माहिती समोर आली कि त्या दोन महिलांमधील एक महिला ही चिनी गुप्तहेर असून एनव्हीडीया कंपनीचे चिप चीनला विकता याव्यात यासाठी ती काम करत असल्याचा संशय निर्माण झाला .

पुढे एनव्हीडीया कंपनीने जेन्सन यांच्यावर चौकशी करण्याची घोषणा केली . जेन्सन हे या कंपनीचे सहसंस्थापक सुद्धा आहेत . AI क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेल्या जेन्सन हुआंग यांच्या अचानक बाहेर पडण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि अमेरिकेत बाजार सुरु होताच प्रमुख शेअर्स जोरात घसरले आहेत .

३३ वर्षाच्या नेतृत्वाचा अचानक शेवट

जेन्सन हुआंग यांनी १९९३ मध्ये या कंपनीची स्थापना केली होती . त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने ग्राफिक्स कार्ड बनवण्यापासून ते AI चिप्स आणि डेटा सेंटर तंत्रज्ञानापर्यंत मोठी झेप घेतली होती . गेल्या काही वर्षात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या मागणीमुळे एनव्हीडीया जगातील सर्वात महत्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक बनली .

त्यामुळे हुआंग यांचा राजीनामा हा केवळ कंपनीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण AI उद्योगासाठी ,महत्वाचा बदल मानला जात आहे . कंपनीने त्यांच्या जागी मुख्य वित्तीय अधिकारी कोलेट क्रेस यांची अंतरिम CEO म्हणून नियुक्ती केली आहे . कायमस्वरूपी उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे .

Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी

राजीनाम्याच्या बातमीने शेअर बाजारात भूकंप

हुआंग यांच्या राजीनामच्या बातमीने अमेरिकन शेअर बाजारात मोठी उलथापालथ सुरु झाली आहे . व्यवहार सुरु होताच डाऊ जोन्स , S & P ५०० आणि नॅस्डॅक या प्रमुख निर्देशांकामध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे . सगळ्यात जास्त परिणाम हा नॅस्डॅक मध्ये दिसून आला आहे . आता एनव्हीडीयाच्या नेतृत्व बदलांमुळे कंपनीच्या भविष्यावर अंडी AI क्षेत्रातील गुंतवणुकीवर काय परिणाम होईल , याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे . तसेच याच्या परिणाम या कंपनीशी संबंधित कंपन्यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे .

World News : पुन्हा संघर्ष होणार ? इस्रायली सैन्याला हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश; इराणचा जगाला गंभीर इशारा

राजीनाम्याची तीन प्रमुख कारणे

यातले पहिले कारण असे आहे कि अनैतिक संबंध ज्यामध्ये हुआंग यांच्यावर दोन महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप झाले . त्यापैकी एक महिला चीनशी संबंधित गुप्तचर कारवायांच्या संशयाच्या कक्षेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे . तर दुसरा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा , संबंधित महिलेच्या माध्यमातून एनव्हीडीयाची संवेदनशील माहिती चीनपर्यंत पोहोचली का ? याबाबत अमेरिकेत चिंता व्यक्त झाली .

कंपनीच्या संचालक मंडळाने ८ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र चौकशी सुरु केली होती . मात्र कंपनीची गुपिते किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती लीक झाल्याचा पुरावा असल्याचे जाहीर झालेले नाही . तर तिसरे कारण असे आहे कि कंपनीवर वाढत चाललेला दबाव कारण या प्रकारामुळे जेन्सन हुआंग यांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण केले गेले आहेत . संचालक मंडळ त्यांच्या भवितव्याबाबत चर्चा करत असल्याचे समजते आहे . यासर्वानंतर अखेर त्यांनी १२ नोव्हेंबला तात्काळ राजीनामा दिला आहे .

 

 

 

Web Title: Breaking news nvidia jensen huang ceo resignation us stock market fall cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • America news
  • Artificial intelligence
  • Breaking News
  • Marathi News
  • Stock market news

संबंधित बातम्या

Tech News : Meta AI आता थेट स्मार्टवॉचवर; Apple Watch आणि Android घड्याळांवरून करता येणार AI शी संवाद
1

Tech News : Meta AI आता थेट स्मार्टवॉचवर; Apple Watch आणि Android घड्याळांवरून करता येणार AI शी संवाद

Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी
2

Breaking News : चीनमध्ये वजन कमी करण्याच्या गोळीला मंजुरी; ‘एली लिली’ ठरली पहिली कंपनी

World News : पुन्हा संघर्ष होणार ? इस्रायली सैन्याला हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश; इराणचा जगाला गंभीर इशारा
3

World News : पुन्हा संघर्ष होणार ? इस्रायली सैन्याला हल्ल्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश; इराणचा जगाला गंभीर इशारा

Kia India News : किया इंडियाचा भारतात मोठा विस्तार; आंध्र प्रदेशात दुसरा उत्पादन प्रकल्प उभारणार; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक
4

Kia India News : किया इंडियाचा भारतात मोठा विस्तार; आंध्र प्रदेशात दुसरा उत्पादन प्रकल्प उभारणार; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.