Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: शहराच्या मध्यवर्ती भागासाठी ‘या’ दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव; आमदार हेमंत रासने यांचा पुढाकार

ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. परिणामी, वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2025 | 02:35 AM
Pune News: शहराच्या मध्यवर्ती भागासाठी दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव; आमदार हेमंत रासने यांचा पुढाकार

Pune News: शहराच्या मध्यवर्ती भागासाठी दोन भुयारी मार्गांचा प्रस्ताव; आमदार हेमंत रासने यांचा पुढाकार

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक जलद व सोयीस्कर करण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन भुयारी मार्गांच्या निर्मितीसाठी आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रस्तावास गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत प्रकल्पांच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळे तसेच प्रमुख बाजारपेठा शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. परिणामी, वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रस्तावित भुयारी मार्ग हे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरणार असून, पुणेकरांसाठी हा एक महत्त्वाचा बदल ठरेल.या प्रस्तावास गती देण्यासाठी हेमंत रासने यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मंजुरीसाठी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पुढील आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन भोसले यांनी दिले आहे. तसेच, हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा शब्द दिल्याची माहिती रासने यांनी दिली आहे. खडक येथील रखडलेल्या मामलेदार कचेरीच्या बांधकामाला गती देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची देखील अधिवेशना दरम्यान भेट घेऊन खडकमाळ येथील पोलिस वसाहतीच्या जीर्ण झालेल्या इमारतींची नव्याने उभारणी करण्याची मागणी रासने यांनी केली आहे.

आमदार हेमंत रासनेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

‘स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा’ अशी घाेषणा करीत आमदार हेमंत रासने यांनी मतदारसंघ ‘फ्लेक्समुक्त’ करण्याची घाेषणा केली आहे. त्यांच्या या आवाहनाला भाजपचे कार्यकर्ते प्रतिसाद देतील का ? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. एकही अनधिकृत फ्लेक्स उभारला जाणार नाही, तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ( ता. २६ ) मतदारसंघात २६ ठिकाणी ‘स्वच्छता नारायण’ महापुजा आयाेजित केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Pune News: कसब्याचे आमदार हेमंत रासनेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा; मात्र भाजप कार्यकर्ते साथ देणार का? वाचा सविस्तर

आमदार म्हणून निवडुन आल्यानंतर रासने यांनी कसबा मतदारसंघातील स्वच्छतेचा प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. देशात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदाैर शहराचा त्यांनी महापािलकेचे सफाई कर्मचारी, अधिकारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदींचा अभ्यास दाैराही आयाेजित केला हाेता. या दाैऱ्यात इंदाैर शहर हे  प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर झाल्याचे  निदर्शनास आले हाेते, असे नमूद करीत रासने यांनी पत्रकार परीषदेत कसबा मतदारसंघात यापुढे सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे फ्लेक्स लावणार नसल्याचा निर्णय मी घेतल्याचे जाहीर केले. शहरातील स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास या निर्णयामुळे मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Kasaba mla hemant rasane initiative two subway lines proposed for the city center relief to traffic jam pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Hemant Rasane
  • pune news
  • Pune Traffic

संबंधित बातम्या

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर
1

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर

Pune Petrol Pump Strike: पुणेकरांनो पेट्रोल घ्या भरुन! संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद, नेमकं कारण काय?
2

Pune Petrol Pump Strike: पुणेकरांनो पेट्रोल घ्या भरुन! संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद, नेमकं कारण काय?

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश
3

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
4

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.