
Mulshi Pattern fame Pitya Bhai actor Ramesh Pardeshi joins BJP leaves MNS
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुळशी पॅटर्न फेम पिट्या भाई याने कमळ हाती घेतले. अशातच आता ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट फेम पिट्या भाई अर्थात अभिनेते रमेश परदेशी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रमेश परदेशी यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.संघ कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांन मनसेने फटकारले होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या संचलनामध्ये पिट्या भाई सहभागी झाले होते. त्यांनी संघ गणवेशातील फोटो देखील शेअर केले. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनेते रमेश परदेशी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पिट्या भाईच्या याच्या संघगणवेशातील सोशल मीडिया पोस्टवरून झाप झाप झापलं होतं. त्यानंतर पुन्हा रमेश परदेशीनं सूचक पोस्ट केलेली. आपण नव्या जबाबदारीसाठी सज्ज असल्याचं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं. अखेर पिट्या भाईनं भाजपमध्ये प्रवेश करुन कमळ हाती घेतलं आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले रमेश परदेशी?
अभिनेते रमेश परदेशी म्हणाले की, जय महाराष्ट्र, मी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मा. राज ठाकरे साहेब यांच्यासोबत मी गेले वीस वर्षे काम करत आहे. मात्र सध्या बदललेली परिस्थिती, कलाकारांना आणि मराठी सिनेमांना न्याय देण्यासाठी आणि कुठेतरी माझ्यावरती असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार मला खुणावत होते. म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे कणखर देश चालवत आहेत. मराठी सिनेमा आणि त्याच्याशी संबंधित असलेला ज्या काही अडचणी असतील त्या राज्य शासनाने केंद्राच्या माध्यमातून मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. असेही रमेश परदेशी हे भाजप पक्षप्रवेशानंतर म्हणाले आहेत.