Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

Pune Fire Incidents: दिवाळीच्या आनंदावर पसरले आगीचे सावट! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आगीचा भडका, तर पुण्यात २४ ठिकाणी दुर्घटना; अग्निशमन दलाच्या धावपळीने टळली मोठी जीवितहानी!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 09, 2026 | 12:50 PM
Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

Follow Us
Follow Us:
  • फटाक्यांमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ५०, तर पुण्यात २४ ठिकाणी आगी लागल्या
  • राज्यातील इतर जिल्ह्यांतही मोठे आर्थिक नुकसान झाले; जीवितहानी सुदैवाने टळली
  • अग्निशमन दलाने तत्परतेने सर्व आगींवर वेळीच नियंत्रण मिळवले
Pune Fire Incidents: दिवाळीत राज्यभरात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असतानाच अनेक ठिकाणी या सणाला आगीच्या भीषण घटनांचे गालबोट लागले आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाके वाजवताना झालेल्या निष्काळजीपणामुळे पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासह भिवंडी, नाशिक, बीड, रायगड, धुळे आणि गोंदिया जिल्ह्यात आगीच्या दुर्घटना घडल्या. पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क २५ फ्लॅट्ससह ५० ठिकाणी आगी लागल्याने नागरिक भयभीत झाले होते. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सर्व आगींवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले असून मोठी जीवितहानी टळली आहे.

हेही वाचा: Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून…

पिंपरी-चिंचवडमध्ये २५ सदनिकांना आग; ५० ठिकाणी आगीचे कॉल

पिंपरी-चिंचवड शहरात फटाके फोडताना वेगवेगळ्या भागांत भीषण दुर्घटना घडल्या. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागांत तब्बल २५ फ्लॅट आणि घरांना फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे आग लागली. याशिवाय मोकळी मैदाने, वाळलेले गवत आणि कचऱ्याच्या ठिकाणी आग लागण्याच्या २५ घटना घडल्या. तसेच फ्लेक्स, सोसायट्यांचे कंपाउंड आणि मोबाईल टॉवरला आग लागण्याच्या ५ घटनांची नोंद झाली. एकाच रात्री ५० ठिकाणी आगीचे कॉल आल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांची धावपळ उडाली. जवानांनी कौशल्याने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पुण्यात २४ ठिकाणी आगीचे सत्र; गोंदियात चायनीज सेंटर खाक

फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये पुणे शहरातही २४ वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी येथे फटाक्याची ठिणगी उडाल्याने एका चायनीज सेंटरला भीषण आग लागली, ज्यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले व परिसरात खळबळ उडाली.

हेही वाचा: Fire Incidents: “लक्ष्मीपूजनाच्या रात्री मुंबई अन् ठाण्यात कुठे काय घडलं? १७ मजली इमारतीला आगीसह अनेक ठिकाणी अग्नितांडव…

राज्यातील इतर जिल्ह्यांतही मोठे आर्थिक नुकसान

लक्ष्मीपूजनाच्या रात्री भिवंडी, बीड, रायगड, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांमध्येही आगीच्या अनेक दुर्घटना समोर आल्या आहेत. फटाक्यांच्या निष्काळजी वापरामुळे अनेक ठिकाणी दुकाने, घरे, गोदामे आणि गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या सर्व घटनांमध्ये दुकानदारांचे आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने अग्निशमन दलाच्या वेळेवरील कामगिरीमुळे जीवितहानी टळली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी-चिंचवडमध्ये किती फ्लॅट्सना आग लागली?

    Ans: पिंपरी-चिंचवड शहरात फटाक्यांमुळे जवळपास २५ फ्लॅट आणि घरांना आग लागल्याची नोंद झाली.

  • Que: पुणे शहरात फटाक्यांमुळे आगीच्या किती घटना घडल्या?

    Ans: पुणे शहरात लक्ष्मीपूजनाच्या रात्री आगीच्या २४ घटनांची नोंद झाली.

  • Que: राज्यात इतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आगीच्या घटना घडल्या?

    Ans: भिवंडी, बीड, नाशिक, रायगड, धुळे आणि गोंदिया (सडक-अर्जुनी) येथे आगीच्या दुर्घटना घडल्या.

Web Title: Maharashtra diwali fire incidents pimpri chinchwad pune bhiwandi sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Fire News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Mumbai News: “मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो…” मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला…
1

Mumbai News: “मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो…” मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला…

Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा
2

Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा

देशमुख कुटुंबाची दिवाळी बाभळगावात जल्लोषात साजरी! तिन्ही सुनांचा सासूबाईंसोबत सेल्फी, पाहा खास क्षण
3

देशमुख कुटुंबाची दिवाळी बाभळगावात जल्लोषात साजरी! तिन्ही सुनांचा सासूबाईंसोबत सेल्फी, पाहा खास क्षण

Fire Incident: “दिवाळीच्या दिव्यामुळे काळानं गाठलं!” धाराशिवच्या येडशीत भीषण अग्नितांडव; एकाच कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू
4

Fire Incident: “दिवाळीच्या दिव्यामुळे काळानं गाठलं!” धाराशिवच्या येडशीत भीषण अग्नितांडव; एकाच कुटुंबातील ६ जणांचा गुदमरून मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.