Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: “मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो…” मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला…

Mumbai News: लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या ठिणगीवरून जुहूमध्ये अमानुष कृत्य! दुचाकीजवळ फटाके फोडण्यास मनाई केल्याने एका २१ वर्षीय तरुणाची ५ जणांनी बेदम मारहाण करून हत्या केली; सणासुदीत मुंबईत खळबळ, पोलिसांनी तिघांना केलं जेरबंद!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 09, 2026 | 01:04 PM
Mumbai News: "मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो..." मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला...

Mumbai News: "मी फक्त दुचाकीजवळ फटाके फोडू नका म्हणालो होतो..." मुंबईत क्षुल्लक वादातून ५ नराधमांनी तरुणाला...

Follow Us
Follow Us:
  •  जुहूमध्ये दुचाकीजवळ फटाके फोडण्यास मनाई केल्याने २१ वर्षीय तरुणाची हत्या
  • वाद विकोपाला जाऊन ५ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू
  • जुहू पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून ३ आरोपींना केली अटक
Mumbai News: दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असताना मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. जुहू येथे फटाके फोडण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले, ज्यामध्ये एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दुचाकीजवळ फटाके फोडण्यास मनाई केल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी ३ आरोपींना तातडीने अटक केली आहे.

हेही वाचा: Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

नेमके काय घडले?

ही दुर्दैवी घटना मुंबईतील जुहू येथील व्ही. एम. रोड परिसरात घडली. काल लक्ष्मीपूजनाच्या रात्री सर्वत्र आतषबाजी सुरू होती आणि आनंदाचे वातावरण होते. यावेळी रस्त्याच्या कडेला काही तरुण फटाके फोडत होते. याच परिसरात राहणारा २१ वर्षीय विवेक सिंह आपल्या दुचाकीजवळ उभा होता. तिथेच काही जण फटाके फोडत असताना, विवेकने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना आपल्या दुचाकीजवळ फटाके न फोडण्याची विनंती केली.

विकोपाला गेला वाद

वारंवार सांगूनही त्या तरुणांनी फटाके फोडणे सुरूच ठेवल्याने दोघांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, फटाके फोडणाऱ्या चार ते पाच जणांच्या टोळीने विवेकला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या झटापटीत विवेकला जोरात धक्का लागल्याने तो खाली कोसळला. जमिनीवर आदळल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. 

हेही वाचा: Father Kills Son: मालमत्तेच्या वादातून पोटच्या ७ वर्षांच्या मुलाचा बापानंच आवळला गळा अन् शेतातील नाल्यातून…

उपचारापूर्वीच मृत्यू; ३ अटकेत

हा प्रकार पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत विवेकला विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी जुहू पोलिसांनी तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नेहरूनगर परिसरातून तीन आरोपींना अटक केली आहे. मोहनीश, सतीश आणि राकेश (नावे बदलली आहेत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जुहूमध्ये हत्या झालेल्या तरुणाचे नाव आणि वय काय?

    Ans: हत्या झालेल्या तरुणाचे नाव विवेक सिंह असून तो २१ वर्षांचा होता.

  • Que: हत्येचे नेमके कारण काय?

    Ans: दुचाकीजवळ फटाके फोडण्यास मनाई केल्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून ही हत्या झाली.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणी किती जणांना अटक केली आहे?

    Ans: जुहू पोलिसांनी हत्येप्रकरणी ३ आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Mumbai juhu diwali murder firecrackers dispute 3 arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • Mumbai Crime case
  • Mumbai News
  • Youth Murder

संबंधित बातम्या

Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा
1

Pakistan : पाकिस्तानात दिवाळीच्या दिवशी हिंदूंचे कौतुक; पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जिनांचा उल्लेख करत केला मोठा दावा

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग
2

Pune Fire Incidents: दिवाळीत महाराष्ट्रात फटाक्यांमुळे अग्नितांडव! पिंपरी-चिंचवडमध्ये २५ फ्लॅटसह ५० ठिकाणी आग

गोव्याचा पालोलेम समुद्रकिनारा आशियात अव्वल! अर्धचंद्राकार खाडी, पांढरीशुभ्र वाळू, जागतिक स्तरावर सहावे स्थान
3

गोव्याचा पालोलेम समुद्रकिनारा आशियात अव्वल! अर्धचंद्राकार खाडी, पांढरीशुभ्र वाळू, जागतिक स्तरावर सहावे स्थान

देशमुख कुटुंबाची दिवाळी बाभळगावात जल्लोषात साजरी! तिन्ही सुनांचा सासूबाईंसोबत सेल्फी, पाहा खास क्षण
4

देशमुख कुटुंबाची दिवाळी बाभळगावात जल्लोषात साजरी! तिन्ही सुनांचा सासूबाईंसोबत सेल्फी, पाहा खास क्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.