Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sports News: गौरवास्पद! राज्यातील १६९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करत असल्याचे सांगून, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्न करत राहील आहि ग्वाही दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 18, 2025 | 05:43 PM
Sports News: गौरवास्पद! राज्यातील १६९ खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  महाराष्ट्र राज्याने खेळाला नेहमी प्रोत्साहन दिले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीसह अन्य खेळांना प्रोत्साहन देत खेळाडूंना मदत केली. त्यामुळेच खेळासह देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान नेहमीच अग्रभागी राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी केले.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने  आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( सन २०२२-२३ व २०२३-२४) वितरण सोहळा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, पणन मंत्री जयकुमार रावल, क्रीडा सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे आदी उपस्थित होते.

माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तर सन २०२२-२३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंटन प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना प्रदान करण्यात आला. तसेच २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक विजेते आर्चर आदिती स्वामी, ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांना सन्मानित करण्यात आले. जीवन गौरव पुरस्कारसाठी ५ लाख, शिवछत्रपती पुरस्करासाठी ३ लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.

 या पुरस्कारांसह यावेळी दोन्ही वर्षाचे उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार ,दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे ५ प्रकारचे पुरस्कार १६९ खेळाडू व प्रशिक्षक यांना प्रदान करण्यात आले.

 राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये आज क्रीडा संकुल उभे करण्यात राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने पुढाकार घेतला आहे. अशा वेळी शाळा महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे खेळ हे ही एक करियर ची संधी आहे हे विध्यार्थ्यांमध्ये रुजविले पाहिजे. मेट्रो शहरातील मोठी मैदाने शाळा महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना सहजरित्या उपलब्ध करुन दिली पाहिजेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करत असल्याचे सांगून, त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रयत्न करत राहील आहि ग्वाही दिली. शिव छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंना मिळालेली राज मान्यता आहे. या पार्श्वभूमीवर या पुरस्कार विजेत्यांनी यापुढे खेळ, खेळाडूच्या विकासासाठी काय करता येईल याचा विचार करून नवीन खेळाडूंना योग्य दिशा दाखविण्याची कामगिरी केली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, क्रीडा विभागाकडून वितरित होणारे शिव छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार दर दोन वर्षानी एकत्र न देता, त्याबट्या वर्षाचे पुरस्कार त्याच वर्षी द्यावेत आशा सूचना केल्या. सोहळ्याच्या शिष्टचारानुसार मला बोलायला मला पाच मिनिटे वेळ दिला पण क्रीडा विभागाच्या मागण्या मोठ्या आहेत. तरीही जास्त न बोलता अर्थ खाते या विभागाला सर्वोतोपरी सहकार्य करेल. यंदाच्या अर्थसंकल्पात आम्हाला खूप कसरत करावी लागली. पण येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये क्रीडा विभागाची सर्व गरज भरून काढली जाईल असे आश्वासन दिले.  कार्यक्रमाचे प्रस्तावित क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. यावेळी त्यांनी क्रीडा विभागाचा आर्थिक निधी वाढवून मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

पवारजी निधी देताना शिष्टाचार पाळू नका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मला शिष्टाचारानुसार केवळ पाच मिनिटे बोलण्यास दिले असल्याचे सांगितले होते. हाच धागा पकडून राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या भाषणात अजित पवार जी तुम्ही तुमच्या भाषणात वेळेचा शिष्टाचार पाळला. पण क्रीडा विभागाला निधी देताना कुठलाही शिष्टाचार पाळू नका. अधिकाधिक निधी या विभागाला द्या. असे बोलून सर्वांची वाहवाह मिळवली.

Web Title: Maharashtra government awarded 169 players to shivchhatrapti state sports award pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • Governor
  • Maharashtra Government
  • Sports News

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार
1

महाराष्ट्राच्या ‘महा-देवा’ फुटबॉल उपक्रमाला बळ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टायगर श्रॉफसोबत सामंजस्य करार

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!
2

WPL 2026: ‘या’ तारखेपासून महिला प्रीमियर लीग सुरू होण्याची शक्यता; केवळ मुंबई आणि बडोदा येथे सामने होणार!

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा
3

Ladki Bahin Yojana Update: …तर लाडकी बहीण योजेनेचे  पैसे मिळणे बंद होणार; राज्य सरकारचा इशारा

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?
4

Mangal Prabhat Lodha: पत्रकारांसाठी ‘एआय’चे….; काय म्हणाले मंत्री मंगल प्रभात लोढा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.