बारामतीत भीषण अपघात, ट्रकने दुचाकीला चिरडलं, वडिलांसह २ मुलींचा जागीच मृत्यू
पुणे जिल्ह्यातील बारामतीत आज एक काळजाला चटका लावणारी दुर्घटना घडली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली आणि फरपटत नेलं. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वडील आणि त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. ही भीषण घटना आज दुपारी १२ वाजता बारामतीतील खंडोबानगर चौकात घडली. या घटनेमुळे संपूर्ण बारामती शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, ३५ जण जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 16-CA-0212 क्रमांकाच्या ट्रकने MH 42-B-4844 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर असलेले ओंकार राजेंद्र आचार्य (वडील) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन मुली सई (वय 11) आणि मधुरा (वय 5) या दोघींनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले की, ओंकार आचार्य आपल्या मुलींसोबत दुचाकीवरून खंडोबानगर चौकातून जात होते. इतक्यात भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. आणि तिघंही ट्रकच्या चाकाखाली आले. घटनास्थळी हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू; सायकल घेऊन शेळ्यांसाठी चारा आणायला गेला अन्…
या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. अपघातानंतर काहीकाळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे आचार्य कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी खंडोबानगर चौकात योग्य वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.