Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटस येथे कचरा डेपोला भीषण आग; परिसरात धुराचे अक्षरश: लोट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाटस ग्रामपंचायत हद्दीतील अंबिका नगर परिसरात जगदाळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ग्रामपंचायतीने उभारलेल्या कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जातो. या डेपोतील कचऱ्याला अचानक आग लागली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 14, 2026 | 12:12 PM
पाटस येथे कचरा डेपोला भीषण आग; परिसरात धुराचे अक्षरश: लोट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पाटस येथे कचरा डेपोला भीषण आग; परिसरात धुराचे अक्षरश: लोट, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Follow Us
Close
Follow Us:

पाटस : पाटस येथील कचरा डेपोतील कचऱ्याला आग लावण्यात आल्याने संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. या विषारी धुरामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पाटस ग्रामपंचायत हद्दीतील अंबिका नगर परिसरात जगदाळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ग्रामपंचायतीने उभारलेल्या कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जातो. या डेपोतील कचऱ्याला अचानक आग लागली. ही आग कोणी लावली की नैसर्गिकरित्या लागली, याबाबत संभ्रम आहे. मात्र, आग विझवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कोणतीही उपाययोजना न केल्याने आग भडकली व प्रचंड धूर निर्माण झाला. या धुराचा लोट हवेत पसरला.

प्लास्टिक तसेच ओला कचरा जाळल्याने निर्माण झालेला काळा व दुर्गंधीयुक्त धूर आजूबाजूच्या अंबिका नगर, रोहीदास नगर, नागेश्वर मंदिर परिसरातील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात पसरला‌. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, डोळ्यांची जळजळ, खोकला व दम लागण्याचे प्रमाण वाढले आहे. महिला, वयोवृद्ध नागरिक, शाळकरी मुलांना व अस्थमा रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली जात नाही. कचरा साचून राहतो आणि नंतर तो पेटवून दिला जातो. यापुर्वीही दोन वेळा या कचरा डेपोतील कचराला आग लावुन पेटवून दिल्याची घटना घडल्या आहेत. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,’ असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कचरा जाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी हा डेपो कायमस्वरूपी दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात यावा, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 ची काटेकोर अंमलबजावणी करावी.

राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमांनुसार, उघड्यावर कचरा जाळणे बेकायदेशीर आहे. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. ग्रामपंचायतीने तातडीने लक्ष घालून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या संदर्भात ग्रामविकास अधिकारी दिपक बोरावके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हा कचरा पेटवून दिला असावा. याबाबत अधिक माहिती घेऊन ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

Pune News : रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये आढळली बॉम्बसदृश वस्तू; हडपसर परिसरात एकच खळबळ

Web Title: Massive fire at garbage depot in patas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • Massive Fire

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.