Pune News : रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये आढळली बॉम्बसदृश वस्तू; हडपसर परिसरात एकच खळबळ (संग्रहित फोटो)
पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील एका नामांकित सुपर स्पेशालिस्ट खासगी रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू आढळली. ही वस्तू आढळल्याने बुधवारी संध्याकाळी मोठी खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (बीडीएस) तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
बीडीएस पथकाने मोठ्या दक्षतेने ती वस्तू ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी सुरक्षित ठिकाणी हलवली. मात्र, संबंधित वस्तू खरोखर स्फोटक होती की केवळ अफवा पसरवण्यासाठी ठेवलेली बनावट वस्तू, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात भीती आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालय परिसरातील हालचालींवर काही काळ नियंत्रण ठेवण्यात आले.
Dharashiv Crime : कळंब पोलीस ठाण्यात ACB ची धडक कारवाई; 36 हजारांची लाच घेताना पोलीस अंमलदार जेरबंद
रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी सातच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील टॉयलेटमध्ये संशयास्पद वस्तू आढळली. त्या वस्तूमध्ये चार कांड्या, त्यांना गुंडाळलेली टेप आणि घड्याळ असल्याचे दिसून आले. घड्याळावर ७.२१ वाजत असल्याचेही दिसत होते. वस्तू बॉम्बसदृश वाटल्याने कर्मचाऱ्याने ती काळजीपूर्वक एका खोक्यात ठेवून मोकळ्या मैदानात हलवली आणि तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
लॉजिंगच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
दुसरीकडे, पुणे शहरात अवैध धंद्यांवर पुणे पोलीस कारवाई करत आहेत. शहरात अनेक ठिकाणी लॉजिंग आणि मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवले जातात. अशा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र, आंबेगाव परिसरात पोलिसांनी धाड टाकली आणि यामधून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. या महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. त्यांची अखेर पोलिसांनी सुखरुप सुटका केली.
अप्पर डेतोत आग
पुण्यात आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. शहरात नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाल आहे. मात्र, अप्पर डेपो परिसरात भीषण आग लागली होती. या आगीत मंडपाचं साहित्य सगळं जळून खाक झाल आहे. दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास कंट्रोल रूमला आग लागल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला दोन गाड्या पाठवण्यात आल्या होत्या, मात्र गोडावूनमध्ये मंडपाचं साहित्य होत त्याने एवढा पेट घेतला मी सगळं साहित्य जळून खाक झाल.






