Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची उचलबांगडी; मूळ विभागात बदली करण्याचे आदेश

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे अहोरात्र आंदोलन सुरू आहे. एस. एम. जोशी सभागृहाजवळील गरवारे पुलावर शेकडो विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 03, 2026 | 08:51 AM
MPSC सचिवांची उचलबांगडी

MPSC सचिवांची उचलबांगडी

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) सचिव महेंद्र हरपाळकर यांना सचिवपदावरून कार्यमुक्त केले आहे. एमपीएससीच्या कारभारावर उठलेले वादळ आणि पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची मूळ विभागात बदली करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहेत.

एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे अहोरात्र आंदोलन सुरू आहे. एस. एम. जोशी सभागृहाजवळील गरवारे पुलावर शेकडो विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि आमदार विश्वजीत कदम यांनी या आंदोलनात उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. अध्यक्षपदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी लावून धरली आहे.

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी महेंद्र हरपाळकर यांची एमपीएससीच्या सचिवपदी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पेपपरफुटीच्या आरोपानंतर विद्यार्थ्यांच्या वाढत्या आक्रोशामुळे आणि मागणीनुसार सरकारने त्यांची बदली केली आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणानंतर आयोगाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

यानंतर विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आयोगाच्या अध्यक्षांसह सचिवांच्या बदलीची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून कठोर निर्णय घेतले जातील, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

मोठी भरती केली जाणार

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC JOB) मधील घोटाळ्यांच्या बातम्यांनी अनेकांना वीट आणला असेल. त्याबातम्यांपासून थोडी फारकत घेत मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका महत्त्वाच्या वाक्याचा विचार करत स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला लागावे असेच म्हणावे लागेल, कारण आतापर्यंतचे विक्रम मोडणारी मोठ्या प्रमाणातील एमपीएससी भरती करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या मागणीला जोर

तसेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी पुढे येत आहे. दळवी समितीने त्यावेळी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शिफारस केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा या मागणीने जोर धरला आहे. म्हणून समितीने जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न स्वीकारण्याची मागणी करते, तर शासन त्याबाबत सकारात्मक असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Rayat Shikshan Sanstha : ग्रामीण महाराष्ट्राला शिक्षणाची दिशा देणाऱ्या ‘या’ महानायकाबद्दल एकदा वाचाच

Web Title: Mpsc secretary mahendra harpalkar relieved of his post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 08:51 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.