Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मिसिंग लिंक नव्हे, ही तर…”; नव्या मार्गिकेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा जुन्या सरकारवर टोला, प्रवाशांची माफीही मागितली

CM Devendra Fadnavis: १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'चे उद्घाटन केले. २४० किमी वेगाच्या वाऱ्यांना सोसणारा हा पूल आता 'कनेक्टिंग लिंक' म्हणून ओळखला जाणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 01, 2026 | 04:24 PM
नव्या मार्गिकेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा जुन्या सरकारवर टोला (Photo Credit - X)

नव्या मार्गिकेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा जुन्या सरकारवर टोला (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:
  • “मिसिंग लिंक नव्हे, ही तर…”;
  • नव्या मार्गिकेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा जुन्या सरकारवर टोला
  • प्रवाशांची माफीही मागितली
Mumbai-Pune Missing Link: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ (Mumbai Pune Missing Link) प्रकल्पाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प जागतिक अभियांत्रिकीचा एक अद्भूत नमुना ठरला असून, त्याची नोंद थेट ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली आहे.

‘मिसिंग लिंक’ नाही, आता म्हणा…’

उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाचे नाव बदलण्याचे निर्देश दिले. “नथिंग इज मिसिंग, त्यामुळे याला मिसिंग लिंक न म्हणता ‘कनेक्टिंग लिंक’ म्हणा,” असे त्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना सुचवले. हा प्रकल्प मुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी फोडण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

LIVE | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण 🕑 दु. १.५९ वा. | १-५-२०२६📍खालापूर, रायगड.#Maharashtra #MaharashtraDay #MumbaiPuneMissingLink https://t.co/zCNY972DmQ — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2026

प्रवाशांची माफी आणि सुप्रिया सुळेंना टोला

उद्घाटनाच्या दिवशी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर माफी मागितली. “आज एक्सप्रेसवेवर जे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले, त्यांची मी क्षमा मागतो,” असे ते म्हणाले. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या एका व्हिडिओचा संदर्भ देत त्यांनी टोला लगावला की, “सुप्रियाताई, आज तुम्ही शेवटचं ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. तुमच्या सरकारने जे काम थांबवलं होतं, ते आमच्या सरकारने पूर्ण केलंय. आता तुम्ही पुण्याला जाताना कधीच अडकणार नाही”.

Mumbai-Pune Missing Link: आता 90 मिनिटात पुण्यात! मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुकात, आजपासून वाहतुकीसाठी खुला

७ देशांचे योगदान आणि सुरक्षिततेचा ‘कवच’

हा केबल-स्टे पूल आंतरराष्ट्रीय सहकार्यातून साकारला असून यात सात देशांचे तांत्रिक योगदान आहे. डिझाइन कॅनडा आणि आलेखन तैवानमध्ये करण्यात आले. तर चाचण्या डेन्मार्कमध्ये महत्त्वाच्या चाचण्या तर स्पेनमध्ये अग्निशमन सुरक्षा चाचण्या पार पडल्या. तसेच साहित्य व तज्ञ मलेशियातून केबल्स आणि सिंगापूरमधून तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. हा पूल ताशी २४० किमी वेगाच्या चक्रीवादळालाही तोंड देण्यास सक्षम आहे, ज्यामुळे निसर्ग वादळासारख्या संकटातही तो पूर्णतः सुरक्षित राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा

पुलाच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. २४ तास सीसीटीव्ही देखरेख, विशेष व्हेंटिलेशन प्रणाली यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच लेन शिस्त पाळणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन केल्यास चलान आकारले जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळातील आव्हाने पेलत हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्या मजूर आणि इंजिनीअर्सच्या श्रमाचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.

मिसिंग लिंक प्रकल्प काय आहे?

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली आणि सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यान बांधण्यात येणारा हा नवीन मार्ग आधुनिक बोगदे आणि उड्डाणपूल वापरून तयार केला जाईल. अवघड घाट विभागाला वळसा घालून प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रकल्पात अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. डोंगरांमधून खोदलेले लांब बोगदे आणि खोल दऱ्यांवर बांधलेले भव्य पूल या प्रकल्पाला देशातील सर्वात आव्हानात्मक रस्ते बांधकाम प्रकल्पांपैकी एक बनवतात.

Traffic Jam: सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई–पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खासदार सुप्रिया सुळेही अडकल्या

Web Title: Mumbai pune expressway missing link inauguration devendra fadnavis guinness record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Mumbai Pune Missing Link

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.