मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामांच्या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू झालेल्या राजकीय वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतून मनसेप्रमुख राज ठाकरेंना 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत टोला लगावला. तसेच महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेलाही जोरदार…
विधानपरिषदेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था, वाढती गुन्हेगारी, महिला सुरक्षा, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रभाव आणि मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील वाढलेल्या खर्चावर सरकारला धारेवर धरले.
नांदेडमधील विष्णुपुरी पुलाची संरक्षण भिंत कोसळून दोन विद्यार्थिनी जखमी झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. मिसिंग लिंक दुर्घटनेवरील 'भाडे के तट्टू' वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी…
रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसिंग लिंक दुर्घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सभेत फडणवीसांची मिमिक्रीही केली.
जळगावातील कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटी आश्वासने, आरक्षणाचे प्रश्न, समृद्धी महामार्गातील कथित भ्रष्टाचार आणि मुंबईतील पावसाळी दुर्घटनांवरून गंभीर आरोप करत सरकारवर निशाणा साधला.
मिसिंग लिंक प्रकल्पावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. 'मी शिव्याप्रूफ आहे' असे म्हणत त्यांनी ट्रोलर्सना सुनावले, तर प्रकल्प हा भारतातील अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे सांगत विरोधकांच्या…
Dhanashri Kadgaonkar stuck on Mumbai Pune Expressway: मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर ९ तास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या धनश्री काडगांवकर ने मासिक पाळी, वॉशरूम आणि शूटिंगबाबतचा धक्कादायक अनुभव शेअर केला.
लोणावळा-खोपोली परिसरात झालेल्या विक्रमी पावसानंतर बंद करण्यात आलेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकबाबत मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. दरड हटविण्याचे काम आणि सुरक्षिततेची तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने हा…
मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बोगद्याला हानी झाली नसून सुरक्षा तपासणीनंतर वाहतूक सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या काही तासांत लोणावळा आणि तळेगाव परिसरात सरासरीपेक्षा अनेक पटींनी अधिक पाऊस झाला आहे. या अतिवृष्टीमुळे डोंगरकड्यांवरून माती वाहून येण्याच्या घटना वाढल्या असून, प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून…
मुंबई-पुणे मार्गावरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्प पहिल्याच पावसानंतर काही भागात खड्डे पडल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावरून आता काँग्रेस खासदार वर्षा…
मुंबई-पुणे मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याच्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. 'फक्त कनेक्टरजवळ दोनच खड्डे असून एमएसआरडीसी योग्य ती काळजी घेईल,' असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूरजवळ दोन अवजड वाहनांमध्ये पहाटे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एर्टिगा कारमधील दोघेजण जखमी झाले. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंक सुमारे दोन…
मुंबई-पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात बसने तीन खाजगी वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. तिघांचा मृत्यू, चार जखमी; वाहतुकीवर तासाभर परिणाम, पोलिस तपास सुरू.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने प्रवासी आणि वाहनचालकांना भुरळ घातली असली, तरी या आकर्षणामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन वाढताना दिसत आहे.
मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट झाला आहे. मिसिंग लिंकचे आज महाराष्ट्र दिनी लोकार्पण झालं आहे. खालापूर टोल प्लाझापासून तीन किलोमिटर अंतरावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.
CM Devendra Fadnavis: १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक'चे उद्घाटन केले. २४० किमी वेगाच्या वाऱ्यांना सोसणारा हा पूल आता 'कनेक्टिंग लिंक' म्हणून ओळखला जाणार आहे.
देशातील सर्वात लांब बोगदा असणार आहे. या प्रकल्पात एकूण दोन बोगदे असून, त्यातील ९ किमी लांबीचा बोगदा हा देशातील सर्वांत लांब बोगदा ठरणार आहे. तसेच, सर्वांत रुंद बोगदा २३.५ मीटर…
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे कर्जत आणि नेरळमधील रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी तेजी अपेक्षित आहे. प्रवासाचा वेळ कमी झाल्याने हा भाग गुंतवणुकीसाठी प्रथम पसंती ठरत आहे.