Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर पुणे महापालिका ‘अ‍ॅक्शन मोड’वर; केली ‘ही’ मोठी कारवाई

स्वारगेट स्थानकावर अत्याचाराची घटना घडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरात एसटी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2025 | 11:42 AM
महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त

महापािलकेत मनसे विरुद्ध अायुक्त

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : स्वारगेट एसटी बस स्थानकात एका 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका ‘अ‍ॅक्शन मोड’वर आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली आहे.

पुणे महापालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी शर्तीचा भंग करणारे व्यावसायिक यामध्ये स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, मान्य व्यवसाय न करणे, सिलेंडरचा वापर करणे आदी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक, जेसीबी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस कर्मचारी यांचे समवेत कारवाई सुरळीतपणे पार पडली. तसेच अधिकृत फेरीवाले व्यवसायिकांना सद्यस्थितीत व्यवसाय बंद ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे

पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टँड परिसरातील रस्ता पदपथावरील अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त संदीप खलाटे, महापालिका सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली पुणे शहर पोलिस अंतर्गत स्वारगेट पोलीस स्टेशन यांचे समवेत अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली.

स्वारगेट एसटी बस स्थानकावर राज्यातील विविध जिल्ह्यात प्रवासासाठी बससेवा आहे. त्यामुळे 24 तास हा परिसर गजबलेला असतो. प्रवाशांची मोठी तसेच वाहनांची मोठी संख्या यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी सातत्याने होत असते. स्थानकाबाहेरील पदपथावर अनधिकृत व्यावसायिक मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूकीला अडथळा तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरण तापले

स्वारगेट स्थानकावर अत्याचाराची घटना घडल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या परिसरात एसटी प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून लक्ष दिले जात नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात राजकीय पक्षांकडून तसेच सामाजिक संस्थांकडून आंदोलन देखील करण्यात आली आहेत. त्याची दखल घेत महापालिकेने स्वारगेट स्थानकावर अतिक्रमण कारवाई केली, असे अतिक्रमण विभागाने सांगितले.

स्वारगेटसह शिवाजीनगर अन् पुणे स्टेशनचे सेफ्टी ऑडिट होणार

स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या धक्कादायक अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ऑडिट मंगळवारपासून सुरू केले असून, निर्जन स्थळे, टेकड्या, रेल्वे स्टेशन तसेच डार्क स्पॉट्स यांची तपासणी केली जाणार आहे.

नराधम गाडेला अटक

पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. पोलिसांत तक्रार येताच गुन्हा दाखल करत पोलिसांची विविध पथके त्याच्या मागावर होती. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, मध्यरात्री दीडच्या सुमारास त्याला गुणाट या गावातून अटक करण्यात आली.

Web Title: Municipal corporation encroachment department took action against encroachments in swargate area nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 11:42 AM

Topics:  

  • Encroachment Department
  • Pune Municipal Corporation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.