Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील ‘त्या’ गावांच्या विकासासाठी महापालिका थेट जागतिक बँकेकडून कर्ज घेणार

शिष्टमंडळापुढे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत प्रमुख प्रस्ताव सादर केले, ज्यात १२ नव्याने विलीन झालेल्या गावांसाठीच्या ८९० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 24, 2026 | 11:02 AM
पुण्यातील 'त्या' गावांच्या विकासासाठी महापालिका थेट जागतिक बँकेकडून कर्ज घेणार

पुण्यातील 'त्या' गावांच्या विकासासाठी महापालिका थेट जागतिक बँकेकडून कर्ज घेणार

Follow Us
Follow Us:
  • जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याची तयारी सुरू
  • पूर निवारण प्रकल्पाची रूपरेषाही सादर
  • शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला
पुणे : समाविष्ट 12 गावांच्या विकासासाठी महापालिकेने जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याची तयारी सुरू केली असून, त्यामध्ये या गावंतील पाणीपुरवठा प्रकल्प, पूरनिवारण प्रकल्प असा सुमारे १३०० कोटी रुपये खर्चाचा समावेश आहे. याशिवाय अन्य काही प्रकल्प समाविष्ट करून दोन हजार कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे.

महापालिकेने याविषयीचा सगळा कर्ज आराखडा जागतिक बँकेच्या पुण्यात आलेल्या शिष्टमंडळासमोर मांडला. त्याला शिष्टमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, बँकिंग प्रक्रियेद्वारे ७.३% च्या स्पर्धात्मक व्याजदराने दर निश्चिती पूर्ण झाल्याची माहिती, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रिजनल प्रॅक्टिस डायरेक्टर मारा वॉरविक यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळात इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंटआणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन चे प्रतिनिधी होते.

यामध्ये विल्यम रेक्स, नुरू लामा, हर्ष गोयल, नीरज गुप्ता, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि ओमप्रकाश दिवटे, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, उल्का कळसकर, नंदकिशोर जगताप, दिनकर गोजारे, राजेश बनकर हे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या शिष्टमंडळापुढे अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत प्रमुख प्रस्ताव सादर केले, ज्यात १२ नव्याने विलीन झालेल्या गावांसाठीच्या ८९० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पाचा सुरुवातीला अंदाजे चार लाख लोकांना आणि २०५२ पर्यंत ७.७८ लाख लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे, असे शिष्टमंडळाला सांगितल्याचे राम म्हणाले.

School Diwali Vacation 2026 : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या ‘या’ तारखेपर्यंत वाढल्या

एडीएमसीने ३०४ निश्चित केलेल्या ठिकाणी ४०० कोटी रुपयांच्या पूर निवारण प्रकल्पाची रूपरेषाही सादर केली. नव्याने विलीन झालेल्या गावांसाठीच्या सांडपाणी प्रस्तावांवरही चर्चा झाली, ज्यामध्ये सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) आणि अंदाजे ३५७ किमी लांबीच्या सांडपाणी वाहिनीच्या जाळ्याचा समावेश आहे.

महापालिका कर्ज घेत असली तरी…

महापालिका कर्ज घेत असली तरी या गावांच्या विकासासाठी केंद्र, राज्य सरकारही मदत करणार आहे. उर्वरीत खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेला कर्ज घ्यावे लागणार आहे. महापालिकेला ७.३ टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकेल, जे अत्यंत कमी आहे. आम्ही यामध्ये आणखी वाटाघाटी करणार असून, हा व्याजदर कसा कमी होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

– नवलकिशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

==============================

FAQ

कोणती गावे आहेत समाविष्ट?
– पुणे महापालिका हद्द 1987 ला 125 sq km होती. आता 2021 नंतर 508 sq km झाली आहे. यात 2 टप्प्यात गावे आली. 2021 ला समाविष्ट 23 गावे – यांचाच DP आता PMC करत आहे. म्हाळुंगे, सूस, बावधन बु., किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे यासह इतर गावांचा समावेश आहे.

जागतिक बँकेकडून कर्ज म्हणजे नेमके काय? किती रक्कम?
– वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यात World Bank Group – Direct Support – 23 ऑक्टोबर 2026 ची बैठक झाली. PMC मुख्यालयात बैठक – World Bank च्या Mara Warwick, Regional Practice Director for Water यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आले.

सध्या पाण्याची स्थिती काय?
– खडकवासला, नांदेड, नांदोशी, सणसनगर, किरकटवाडी, धायरी, नऱ्हे , जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडीयेथे सध्या फक्त क्लोरीन टाकलेले कच्चे पाणी मिळते.

Web Title: Pune municipal corporation will take loan from world bank for development nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
1

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा
2

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज
3

Pune Voter List Form 6 Form: मतदार नोंदणी सुलभ; प्रक्रियेला गती, नव्या मतदारांच्या नोंदणीसाठी ८३ हजार अर्ज

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी
4

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.